खूप काही

Mumbai update : मुंबईसह 12 किनारपट्टी धोक्यात, ‘या’ शहरांवर होणार मोठा परिणाम

जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.

Mumbai update : जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह 12 शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

परिणामी या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह 12 शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. शतकाच्या अखेरीस ही शहरं 3 फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे. 2006  ते 2018या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे 3.7 मिलीमीटर दराने वाढत आहे.

अंतराळ संशोधन संस्था नासानं आयपीसीसीच्या अहवालाचं मूल्यांकन केलं आहे. यापूर्वी 100 वर्षात असे बदल होत होते. मात्र 2050 नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी असे बदल दिसतील असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. “21व्या शतकात समुद्राच्या पातळीत सतत वाढ होताना दिसेल. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढतील. यापूर्वी 100 वर्षात असे बदल होत होते”, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आयपीसीसी 1988 पासून दर पाच ते सात वर्षांनी पृथ्वीच्या हवामान बदलाचं मूल्यमापन करते. यात तापमान, बर्फाचे आवरण, वायू उत्सर्जन आणि समुद्राच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केलं जातं. दुसरीकडे हिमालयातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली असून डोंगरावरील बर्फाचं आवरण कमी होत आहे. 1970 पासून हिमालयातून उगम पावलेल्या नद्यांही आकुंचन पावत असल्याचं, कृष्णा अच्युत राव यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.

अंतराळ संशोधन संस्था नासानं आयपीसीसीच्या अहवालाचं मूल्यांकन केलं आहे.आयपीसीसी 1988 पासून दर पाच ते सात वर्षांनी पृथ्वीच्या हवामान बदलाचं मूल्यमापन करते. यात तापमान, बर्फाचे आवरण, वायू उत्सर्जन आणि समुद्राच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केलं जातं. दुसरीकडे हिमालयातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली असून डोंगरावरील बर्फाचं आवरण कमी होत आहे. 1970 पासून हिमालयातून उगम पावलेल्या नद्यांही आकुंचन पावत असल्याचं, कृष्णा अच्युत राव यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.

शतकाच्या अखेरीस किनारपट्टीवरील ‘या’ शहरांना धोका:

कांडला- 1.87 फूट, ओखा- 1.96फूट,भावनगर- 2.70 फूट, मुंबई- 9.90फूट, मोरमोगाओ- 2.06 फूट, मँगलोर- 1.87फूट, कोचिन- 1.32फूट,पारादीप- 1.93 फूट, खिडीरपूर- 0.49 फूट,विशाखापट्टणम- 1.77 फूट,चेन्नई- 1.87 फूट, तुतीकोरीन- 1.9 फूट

संयुक्त राष्ट्राच्या समितीचा इशारा:

मानव समुदायाने आजघडीला कार्बन ऊत्सर्जन लक्षणीयरित्या कमी केले तरीही काही दुष्परिणाम हे टाळणे अशक्यच असल्याचा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीने सोमवारी प्रकाशित केलेल्या एका ताज्या अहवालातून दिला आहे. आपण अगोदरच इतके ऊत्सर्जन करून ठेवले आहे की, त्याचे काही गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागणार असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

या तीन हजार पानी अहवालाच्या निष्कर्षानुसार दोन्ही ध्रुवांवरील हिमनग अतिशय वेगाने वितळत असून सागरी पाणीपातळीही त्याच वेगाने वाढत आहे. याच्या परिणामी ऋतुचक्रातही अतीतीव्र टोकाचे बदल बघायला मिळत आहे. विनाशकारी चक्रीवादळे, महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी, अतीतीव्र उष्णता आणि अतीतीव्र थंडीच्या लाटा हे याचेच परिणाम आहेत. आज आपण ऊत्सर्जनात लक्षणीय घट केली तरी काही दुष्परिणाम हे टाळता येणे अशक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कारण आपण आधीच वातावरणात मोठ्या प्रमाणात हरीतगृह वायूंचे ऊत्सर्जन करून ठेवले आहे असे यात स्पष्टपणे म्हटले आहे.

वॉर्मिंगऔद्योगिकीकरणानंतरच्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रामुख्याने उष्णता शोषून घेणारे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारखे वायू कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मानवी कृतीद्वारे कोळसा, इंधन, तेल, लाकडू आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून हे निर्माण झाले आहे. यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाचा अगदीच थोडा वाटा असल्याचे यात म्हटले आहे.

 

 

हे ही वाचा :

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments