खूप काही

Mumbai update : राजकीय वातावरण तापलं, त्या पेगासिस सॉफ्टवेअरचा मुद्दा हायकोर्टात,

Mumbai update : पेगॅसिसच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. ‘पेगॅसिस स्पायवेअर’ तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील बड्या, काही नेतेमंडळी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन हॅक केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला असून महाराष्ट्रात देखील पेगॅसिसचा वापर करून फोन हॅकिंग झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या साल 2019 मधील इस्रायल दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या दौऱ्याचे पेगॅसिसशी संबंध आहेत का?, असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारसह डीजीआयपीआर आणि सबंधित अधिकाऱ्यांना भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच 15 ते 25 नोव्हेंबर 2019 मध्ये डीजीआयपीआरच्या पाच अधिकाऱ्यांचा इस्त्रायलला अभ्यास दौरा झाला होता. या दौऱ्यासाठी प्रशासनाची लागणारी मंजुरी, इतर प्रक्रिया आणि नियमांचे उल्लघंन करण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ते लक्ष्मण बुरा आणि दिगंबर यांनी ‌ऑड. तेजेश दांडे यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाच्या मुद्द्यावरून आता न्यायलयीन चौकशीची मागणीही केली आहे. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली. तेव्हा, आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारची परवानगी घेऊन दौरा होणे अपेक्षित होतं. मात्र, हे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता दौऱ्यावर गेले होते. इस्रायल हा देश कृषी तंत्रज्ञानामध्ये अग्रगण्य आहे. मग, अभ्यास दौऱ्याचा विषय वेब मीडियाचा वापर वाढवणं का होता?, या   पार्श्वभूमीवरच या दौऱ्याच्या मंजुरी आणि हेतूवर नक्कीच शंका आणि प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

तसेच या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून तब्बल 14 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. इस्रायलकडे वेब माध्यमांवर असे कोणतेही विशिष्ट कौशल्य नाही, ज्याचा फायदा राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना होऊ शकतो असाही आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

 

हे ही वाचा : 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments