बीएमसी

Mumbai update : मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये नेमकं काम कस चालतं?

चरा व्यवस्थापनाबाबत 10 वर्षांचा आराखडा तयार करण्यास स्थापत्य समितीने मंजुरी दिली असून त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे.

Mumbai update :  मुंबईच्या विकास आराखड्यात,ज्याप्रकारे पुढील 10 वर्षांसाठी पाणीपुरवठ्याबाबत नियोजन केले जाते त्याच धर्तीवर मुंबईत दररोज निर्माण होणाऱया कचऱयाच्या व्यवस्थापनाबाबत आता अधिक ठोस धोरण बनवले जाणार आहे.कचरा व्यवस्थापनाबाबत 10 वर्षांचा आराखडा तयार करण्यास स्थापत्य समितीने मंजुरी दिली असून त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी आराखडय़ासाठी पाठपुरावा केला होता.

मुंबई महापालिका शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्ध्तीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘घनकचरा व्यवस्थापन आराखडा’ तयार करीत आहे. त्यासाठी ‘व्हिजन 2030’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमाच्या अंतर्गत यापुढे झोपडपट्ट्या, सोसायट्या, कार्यालये आदी ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कचऱ्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी अथवा प्रभागातच लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेकडून कचरा व्यवस्थापनावर होणारया कोट्यवधी रुपयांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. संपूर्ण मुंबईतील कचरा देवनार, कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राउंड हे कचरामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.

समस्या सोडवण्यासाठी त्यांनी देशभरातील कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास केला तसेच महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरचा अभ्यासदौरा केला. त्यातूनच मुंबईसाठी पाणीपुरवठय़ाच्या धर्तीवर कचरा व्यवस्थापनासाठी 10 वर्षांसाठी आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी स्थापत्य समितीसमोर मांडली. त्याचबरोबर हे धोरण राबवताना घनकचऱयाचे धोरण राबवणारा पालिका प्रशासनाचा अधिकारी जरी बदलला तरी मूळ धोरणात काहीही बदल न करता ते धोरण राबवावे, अशी मागणीही केली

‘व्हिजन – 2030’ अंतर्गत स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांच्या भावना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेद्वारे ऑनलाईन सर्वेक्षणाचा प्रारंभ शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या सर्वेक्षणात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा व आपली मते मांडावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबईत यापूर्वी 9 हजार मे. टन इतका घनकचरा निर्माण होत असे. मात्र नंतर पालिकेने सोसायट्यांना त्यांच्या इमारतीच्या आवारात तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक केल्याने व कचऱ्यातील डेब्रिज वेगळे गोळा करून त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने लावण्यात येत असल्याने कचऱ्याच्या प्रमाणात मोठी घट झाली.

‘स्वच्छ मुंबई’ विषयक नागरिकांच्या भावना व मते जाणून घेण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील गरजांच्या दृष्टीकोनातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन आणि भविष्यात निर्माण होऊ शकणा-या संभाव्य समस्यांवर मात करण्यासह मुंबई महापालिका आपल्या साधनांचा व उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

 

हे ही वाचा : 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments