खूप काही

Mumbai update : म्हाडा, राज्य सरकारच्या जमिनीवर मुंबई पालिकेचा अधिकार, घेतला मोठा निर्णय

मुंबई पालिका, जिल्हाधिकारी व 'म्हाडा'ला 'सुरक्षेचा आराखडा' देणार आहे. यानुसार धोकादायक दरडींच्या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Mumbai update : मुंबईत सर्वाधिक धोकादायक दरडी या ‘म्हाडा’, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारच्या जमिनीवर असल्याने पालिकेला सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात अडथळे येत आहेत. यामध्ये 20 ठिकाणे अतिधोकादायक असल्याने त्या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुचवणार असून त्यावर संबंधित मालकी असलेल्या प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

मुंबईत काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसांत दरडी कोसळून 30 जणांचा बळी गेल्यानंतर डोंगर उतारावरील झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईत दरवर्षीच्या मुसळधार पावसांत दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मालाड, भांडुप आणि विक्रोळीमध्ये दरडी कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला. मुंबईत अशा सातत्याने घटना घडत असल्याने धोकादायक दरडींच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत.

मुंबईतील 291 धोकादायक असलेल्या दरडींच्या ठिकाणांमधील अतिधोकादायक असलेल्या 20 ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

मुंबई पालिका, जिल्हाधिकारी व ‘म्हाडा’ला ‘सुरक्षेचा आराखडा’ देणार आहे. यानुसार धोकादायक दरडींच्या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी आयआयटी सारख्या संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

अतिधोकादायक आढळलेल्या 30 ठिकाणांचे पालिका आणि तज्ज्ञ संस्था, व्यक्तींकडून ऑडिट केले जाणार आहे. धोका असलेल्या काही घरांमधील रहिवाशांचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याच्या सूचनाही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments