खूप काही

Mumbai update : म्हाडाची पुन्हा ऑफिर, मात्र या अर्जदारांना मिळणार संधी

मंडळाने अर्जदारांना या योजनेतील घरे स्वीकारण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai update :म्हाडाच्या कोकण मंडळाने वीस वर्षांपूर्वी ठाणे येथील चितळसर मानपाडा येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील गृह योजनेसाठी अर्ज मागविले होते. मात्र ही योजना आजवर प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मात्र आता या योजनेचा मार्ग आता मोकळा झाल्याने अखेर म्हाडाने 2000 आणि 2004 मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागून घेतले आहेत. त्यानुसार अशा अर्जदारांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान, पासपोर्ट साइज फोटो आदी कागदपत्रे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत इस्टेट मॅनेजर 1, कोकण मंडळ, कक्ष क्रमांक 172, पोटमाळा गृहनिर्माण भवन, कलानगर वांद्रे पूर्व येथे अर्ज करावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे ही योजना राबिण्यात आली नव्हती. त्यामुळे आता मंडळाने स्विस चॅलेंज पद्धतीनुसार योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर या योजनांमध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांनी अनामत रक्कम मंडळाकडून घेतलेली नाही. अशा अर्जदारांना पुन्हा घरे देण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.

कोंकण मंडळाने चितळसर मानपाडा ठाणे येथील घरासाठी 3 जुलै ते 2 ऑगस्ट 2000 या कालावधीत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी अनामत रक्कम घेऊन अर्ज मागवले होते.गटासाठी 20 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2004 मध्ये अर्ज मागविले होते.

त्यानुसार आता मंडळाने अर्जदारांना या योजनेतील घरे स्वीकारण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ज्या अर्जदारांना अनामत रक्कम हवी असल्यास त्यांना बिनव्याजी रक्कम 31ऑगस्टनंतर परत बिनव्याजी परत करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळाने स्वीज चॅलेंज योजनेतील अल्प उत्पन्न गटासाठी स्वहस्ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments