आपलं शहर

Mumbai update :मुंबईत पुन्हा पावसाची रिमझिम; पहा हवामान खात्याचा अंदाज

अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे.

Mumbai update :अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(heavy rainfall)

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरूच होता.मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.रात्रीभर मुंबईत चांगलाच पाऊस झाला आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात प्रचंड काळे ढग दिसून येत आहेत.मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिप रिप सतत सुरु आहे. अद्याप पाणी साचल्याचं कुठेही समोर आलेलं नाही. अंधेरी, बांद्रा, दादर आणि दक्षिण मुंबईत सततधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, पनवेल परिसरात देखील सततधार पाऊस सुरु आहे. तसेचं पुण्यात सकाळपासून हलका पाऊस सुरु आहे. (Andheri to Bandra Dadar)

हवामान विभागाची माहिती; (Meteorological department information )

21 ऑगस्ट – आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट – आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे 23 ऑगस्ट – आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments