खूप काही

Mumbai Updates : गुंतवणूकदारांनो सावधान; शेअर बाजारात मोठा बदल होण्याची शक्यता

शेअर बाजारात मंगळवारी दिवसभर खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा सुरू

Mumbai Updates  : शेअर बाजारात मंगळवारी दिवसभर खरेदी-विक्रीच्या  ( sell- buy ) जोरदार लाटा सुरू होत्या . मात्र दिवसाअखेरीस निर्देशांकात मोठी वाढ होऊन निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर विराजमान झाले आहेत. हे नेतृत्व एचडीएफसी, एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोटक बॅंक या कंपन्यांनी केलेले आहे.( HDFC, tech Mahindra, Infosys, kotak Bank)

खासगी बॅंका आणि वित्तीय कंपन्या व माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाल्याने निर्देशांकांना आधार मिळाला आहे. मात्र सरकारी बॅंका आणि रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली.( Government and reality companies)

बाजार बंद होण्याच्यावेळी मुंबईत शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 151 अंकांनी वाढून 54,554 या नव्या उच्चांकी पातळीवर ठप्प झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांनी वाढून 16,280 अंकांवर बंद झाला.

मंगळवारी दूरसंचार, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक 2.07 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. धातू, रिऍल्टी क्षेत्राचे निर्देशांक 2.27 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. मुख्य निर्देशांक वाढले असले तरी छोट्या कंपन्यांच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन टक्‍क्‍यांपर्यंत घसरले.

मात्र खरेदीच्या वातावरणातही टाटा स्टील, एनटीपीसी, आयटीसी, पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या विक्रीवर चांगलाच परिणाम झाला आहे.सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. (Tata steel ,NTPC, ITC ,power Grid company)

कोरोनाच्या रूग्णांची संख्या जगातील काही भागात वाढत आहेत. त्यामुळे धातु ( steel) क्षेत्रात देखील परिणाम झाला असल्याचे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. त्याचबरोबर अमेरिका लवकरच व्याजदरातील सवलती कमी करण्याची शक्‍यता असल्याच जागतिक बाजारात चर्चा सुरू आहे.

गेल्या काही महिन्यापासून मिड कॅप (mid cap) आणि स्मॉल कॅप (small cap) वाढत होते. मात्र आता या क्षेत्रात विक्रीचे वारे निर्माण झाले आहेत.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments