आपलं शहर

Mumbai Updates : मुंबईतील निर्बंध शिथिल , काय आहे दुकानांच्या वेळा

आठवड्यातील सर्व दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मुभा

Mumbai Updates : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात असल्याने, निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार केली जात होती.आता मुंबईमधील व्यापाऱ्यांना ( Mumbai shopkeeper)  मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या आदेशात नमूद केल्यानुसार, मुंबईतील सर्व दुकाने रात्री (night)10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. विशेष म्हणजे आठवड्यातील सर्व दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मुभा महानगरपालिकेकडून(BMC)  देण्यात आली आहे.

गेल्या दोन आठवड्यांत मुंबई पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी गाफील राहून चालणार नाही.मात्र लोकलच्या बाबतीत राज्य सरकारकडून अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही .

  • तसेच नवीन नियमावलीनुसार सर्व दुकाने आठवड्यात दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  •  त्याचवेळी मेडिकल आणि केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस 24 तास उघडी ठेवता येतील.
  • सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स ( hotel , restaurants) आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
  • जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असेल.
  • -कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तुंसोबतच आवश्यकेतर वस्तुंचे वितरण करण्यास परवानगी असेल.
  • गार्डन  (garden)आणि मैदानं (ground)व्यायामासाठी खुली असतील. चित्रपटगृहं मात्र बंदच राहतील.
  • सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं( place) बंदच राहतील.

शेतीविषयक कामकाज, सिव्हिल वर्क, औद्योगिक काम, मालवाहतूक यांचं कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू राहील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments