आपलं शहर

Mumbai Updates : दहावी – बारावीच्या परीक्षेचे शुल्क परत मिलणार नाहीच, पाहा काय म्हणते सुप्रीम कोर्ट

त्यानुसार राज्याचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.

Mumbai Updates :यंदा कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या ( ten and twelve )परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र राज्य शिक्षण मंडळांनं दहावी आणि बारावीची परीक्षा न घेता ऐतिहासिक निकाल लावण्याचं निश्चित केलं. त्यानुसार राज्याचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष मूल्यांकन पद्धतीनं हा निकाल लावण्यात आला. मात्र ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही आक्षेप आहे किंवा परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

राज्य शिक्षण मंडळानं एक पत्रक काढून पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज ( online from ) भरण्याची मुदत 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. या तारखांदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यानही विद्यार्थ्यांना अर्ज भारत येणार आहे मात्र यासाठी त्यांना विलंब शुल्क द्यावं लागणार आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर जमा केलेले परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. (Super Cort )

न्या. ए.एम. खानविलकर ( a.m.khanvilkar )आणि दिनेश माहेश्वरी ( Dinesh maheshwari ) यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या याचिकेत ठोस कारण नसल्याचे नमूद करीत राज्यातील माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने ( junior and degree exam )  परीक्षेची तयारी केली होती परंतु ऐनवेळी कोरोना संकट उद्भवल्याने तयारीवर केलेला सर्व खर्च वाया गेल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे परीक्षा शुल्क परत करणे हितावह नाही, असेही म्हटले.

काही पालकांनी मुंबई हायकोर्टात( Mumbai highcort)  )  एक याचिका सादर केली होती. त्या याचिकेवरून हायकोर्टाने महाराष्ट्र बोर्डला परीक्षा शुल्क परत घेण्याच्या अर्जावर विचार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बोर्डने सुप्रीम कोर्टात ( supreme court )  धाव घेतली होती. या याचिकेची दखल घेत सुप्रीम कोर्टाने राज्यातील शिक्षण मंडळ व परीक्षा बोर्डकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त होताच याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments