आपलं शहर

Narali poornima:नारळी पौर्णिमा ठरणार का वादाचे कारण; मुंबई पोलिसांनी दिला इशारा

श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव येतात. त्या

Narali poornima :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून कोणताही कार्यक्रम करण्यास परवानगी नाही.श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव येतात. त्यापैकीच एक म्हणजे नारळी पौर्णिमा सध्या कोरोना निर्बंधात सूट मिळाली असली तरी मुंबई,शासनाने अद्याप सार्वजनिक सणाकरीता बंदी घातली आहे.परंतु मनसेकडून आज दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे जोरदार आयोजन केले आले.(dadar )

मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनचा गर्दीला बंदी आहे. दादरमध्ये नियमांचे उल्लंघन करून नारळी पौर्णिमा साजरी (Narali Purnima) करण्यात येणार असल्याचे कळताच जनतेचा सुरक्षितेसाठी पोलिसांनी निर्णय घेतला आहे. कोरोनातील सर्व गोष्टींचा आढावा घेऊन दादर मधील मुंबई पोलिसांनी कार्यक्रमाबद्दल (Mumbai Police) मनसैनिकांना 149 ची नोटीस बजावली आहे.दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून वातावरण खवळण्याची शक्यता दिसत आहे.

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेच्या सणाला विशेष महत्व असतं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करून पूजा करतात. त्यानंतर मासेमारीसाठी होड्या पुन्हा समुद्रात नेल्या जातात. यंदा 22 ऑगस्ट 2021 रोजी नारळी पौर्णिमा आहे.

याच दिवशी महाराष्ट्र आणि अन्य भागात दुसरा श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे. श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते.(raksha Bandhan)

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments