खूप काही

Narayan Rane : बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू…

केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार, 19 ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली आहे.

Narayan Rane : भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन 114 सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊनच सुरू होणार आहे. त्यामुळे, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न राणेंकडून होत असल्याचे दिसून येते.

मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू होत असून स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुनच सुरुवात होत आहे.शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर जाऊन राणेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येईल. नारायण राणे पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जात आहेत. त्यामुळे, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार, 19 ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबई आणि कोकण पट्ट्यातही असणार आहे. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे 7 दिवस चालणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत एकूण 170 हून अधिक भागांना भेट देणार आहेत. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. या यात्रेत भाजपसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्तेही भाग घेणार आहेत.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments