Narendra Patil : चक्क देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले टॅटूने गोंदून…
Narendra Patil : समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

Narendra patil : समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मग ते प्रेम कोणी कशाप्रकारे व्यक्त करायचं, तेही त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. मग, तो एखादा सुपरस्टार असो किंवा एखादा संगीतकार, नाहीतर एखादा नाटककार असेल.
सध्या अशाच एका गोष्टीची मोठी चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चक्क मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. स्वतःच्या हातावर त्यांचे नाव टॅटूने गोंदून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेले प्रेम यातून व्यक्त होत आहे.
मी राष्ट्रवादी विधानपरिषदेचा आमदार असताना देवेंद्र फडणवीस भाजपचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजासाठी जे कार्य केलेले आहे, ते यापूर्वी एकाही मुख्यमंत्र्याला करता आलेले नाही, असे नरेंद्र पाटील यांची पत्रकारांशी बोलताना मत मांडलं आहे.
प्रत्येक मुख्यमंत्र्याने आत्मपरीक्षण करावे. तसेच आपण अनेक मराठा समाजासाठी काय केले आहे आणि इतर समाजातील लोकांसाठी काय केले आहे, याचा विचार करावा, असाही टोला नरेंद्र पाटलांनी लगावला आहे. म्हणूनच, ज्या व्यक्तीच्या पोटात आणि ओठात मराठ्यांविषयी सकारात्मकता आहे, अशांचाच हातावर टॅटू बनवावा, असे विचार नरेंद्र पाटील यांनी मांडले आहेत.
राजकारणात अनेकजण नेते येतात आणि जातात, सत्तेवर असताना महत्त्वपूर्ण कार्य करतात. परंतु, जे जनतेमागे खंबीरपणे उभे राहतात, अशाच मुख्यमंत्र्यांचे स्मरण सगळ्यांनीच करावं असे नरेंद्र पाटीलांचे म्हणणे आहे.
ओठांवर वेदना होतात, म्हणून जिथे काही केलं नाही त्याठिकाणी मुख्यमंत्र्याचे नाव हातावर गोंदवले, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील तेव्हाच सगळ्या गोष्टी पूर्णपणे मार्गी लागतील, असे म्हणत अजूनही देवेंद्र फडणवीसांवर तेवढेच प्रेम आहे, म्हणून मी त्यांनाच मुख्यमंत्री मानतो, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.