लोकल

Navi Mumbai metro : नवी मुंबईत लवकरच धावणार मेट्रो, कामाची ताजी अपडेट काय?

नवी मुंबईकरांचे मेट्रोमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच साकार होण्याचे संकेत दिसत आहेत.

Navi Mumbai metro :नवी मुंबईकरांचे मेट्रोमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच साकार होण्याचे संकेत दिसत आहेत. कारण सिडकोने बांधलेल्या बेलापूर ते पेंढार मेट्रो मार्गावरील भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाईन आणि मानक संस्थेने (RDSO) ने या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील आपत्कालीन ब्रेक यंत्रणेची कामे सुरू केली आहेत.Metro to run soon in Navi Mumbai, what’s the latest work update?

विशेष म्हणजे नवी मुंबई मेट्रो या वर्षाच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रस्ताव देखील आहे. या अगोदर, RDSO द्वारे त्याची दोलन आणि आपत्कालीन ब्रेक प्रणालीची चाचणी करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.तसेच त्यात प्रवासाची गुणवत्ताही सुधारली आहे. तर ही चाचणी येथील मेट्रो लाइन -1 वरील पेंढार मेट्रो स्टेशन आणि खारघरमधील सेंटर पार्क रेल्वे स्टेशन दरम्यान केली जात आहे.

नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पेंढार ते सेंटर पार्क मेट्रो स्टेशनपर्यंत RDSO चे संयुक्त प्रशासक अनंत तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी सुरू झाली आहे. RDSO चे अभियंता अरविंद कुमार सिंह, राम आशिष सिंग, संजीवकुमार चव्हाण, आदित्य गुप्ता आणि के.पी.सिंह. या 5 अभियंत्यांच्या निरीक्षण पथकाच्या देखरेखीखाली ही ट्रायल केली जात आहे.

पेंढार ते सेंटर पार्क मेट्रो मार्ग 5.14 किलोमीटर आहे. सिडको नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील लाइन -1 वर मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. ही तयारी प्रत्यक्षात आणण्यासाठी, RDSO या मार्गाच्या लाइन -1 वर पेंढार आणि सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोची सुरक्षा आणि गुणवत्तेची चाचणी घेत असून बेलापूर ते पेंढार या मेट्रो मार्गाचे काम सिडकोने महामेट्रोकडे सोपवले आहे, ज्याने अमोल तितरमारे आणि बाळू देवडे नावाच्या दोन तरुण मोटरमनना नागपूरहून पेंढार ते सेंटर पार्कपर्यंत लाइन -1 वर मेट्रोची चाचणी करण्यासाठी पाठवले आहे.

या दोघांनी पेंढार ते सेंटर पार्कपर्यंत मेट्रोची ट्रायल रन सुरू केली आहे. सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया तांबे यांनी सांगितले की, ही चाचणी 8 दिवस सुरू राहणार आहे.सध्या मेट्रो 60 किमी प्रतितास वेगाने चालवली जात असून यानंतर, त्याचा वेग हळूहळू 90 किमी प्रतितास केला जाणार आहे. विशेष म्हणजे ही तपासणी यशस्वी झाल्यास नवी मुंबई मेट्रोला धावण्यास ग्रीन सिग्नल मिळणार आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments