खूप काही

Nitesh rane : आम्ही शिवसैनिकच, पण राऊतांचे काय? राणेंचा अजब सवाल

आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

Nitesh rane : सध्या राणे आणि शिवसेना वादामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. त्यात आता ‘राणे शिवसैनिक आहेत’ या संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत आहे. हो आम्ही शिवसैनिकच आहोत आणि मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत. त्याचा आम्हाला अभिमानही आहे पण संजय राऊतांचं काय? ते शिवसैनिक आहेत की शरद पवारांचे सैनिक आहेत हे त्यांनीच सांगावं. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत अशी ओळख जाहीरपणे सांगतोय पण ते तसं सांगू शकणार नाहीत. कारण ते शिवसेनेचं नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करत आहेत’, अशा शब्दांत नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

 

मुंबईमध्ये दादर येथे भाजपच्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. यानिमित्त भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. पत्रकारांनी “याच चौकात आधी सेना-भाजपमध्ये राडा झाला होता. आता परत भाजप सेनेला डिवचण्याचं काम करतेय का?” असा प्रश्न विचारला असता.”तो राडा नव्हता झाला, आम्ही चोपलं त्यांना. तुमचा प्रश्न चूकीचा आहे.” असं नितेश राणे यांनी म्हटलं.

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहलेलं नाही. मुंबई ही आमचीसुद्धा आहे. त्यामुळे भाजपच्या विविध कार्यालयाचे उद्घाटन आहे. निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आजचा दौरा आहे. यामध्ये कोणाचा बालेकिल्ला असो किंवा नसो भाजप कसा वाढेल यासाठी ही आमची सुरुवात आहे, असे भाष्य नितेश राणे यांनी केले. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments