खूप काहीफेमस

Olympics Update:पी.व्ही.सिंधूची ऑलिम्पिक मध्ये एतिहासिक कामगिरी, भारताने मिळवले रौप्य आणि कांस्यपदक…

पी.व्ही.सिंधूविरुद्ध ही बिंग जिओची कामगिरी उत्कृष्ट होती.

Olympics Update :भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) चीनच्या ही बिंग जिओला हरवून इतिहास रचला.भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी.व्ही.सिंधू पहिली महिला खेळाडू बनली आहे.आज (1ऑगस्ट)झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत पी.व्ही.सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आता सिंधूने भारताला कांस्यपदक जिंकून दिले आहे.

दुसऱ्या सेटमध्येही ही बिंग जियाओचा 21-15 पराभव केला. 52 मिनिटे चाललेल्या सामन्यांमध्ये पी.व्ही.सिंधूने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.सिंधूला टोक्यो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पी.व्ही.सिंधूविरुद्ध ही बिंग जिओची कामगिरी उत्कृष्ट होती. जिओने या सामन्यापर्यंत सिंधूसोबत 15 पैकी नऊ सामने जिंकले आहेत, तर सिंधूला केवळ सहा सामने जिंकता आले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासूनची खडतर मेहनत आहे.सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. रिओ ऑलिंपिकमध्ये सिंधूनं सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. भारताला मिळालेलं हे दुसरं मेडल आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments