खूप काही

Political update : रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी, राज्य सरकारचे मोठे निर्णय…

(3 ऑगस्ट) काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णययांना मंजुरी देण्यात आली.

Political update : (3 ऑगस्ट) काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णययांना मंजुरी देण्यात आली. त्यात जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.जालना येथे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून, यामुळे रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालय उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी 104 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचं सांगण्यात येतआहे.

तसेच राज्‍यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये आहेत. जालना शहर मराठवाडा व विदर्भासाठी मध्यवर्ती असे शहर आहे. या भागातील रुग्‍णांना उपचारांकरिता पुणे, नागपूर येथे जावे लागते. जालना जिल्‍ह्यात प्रादेशिक मनोरुग्‍णालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी करण्यात येत होती. आता अखेर तसा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास देखील आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.राज्यातील कृषी विद्यापीठे संलग्न कृषी महाविद्यालये यामधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना 1जानेवारी 2016 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु त्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमीन देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता.शिरोळ) नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता होती. त्यासाठी जयसिंगपूर येथील सि. स. नं. 2356 अ/1अ/1 क्षेत्र 2108 चौ. मी. ही शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मान्यता देण्यात आली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments