खूप काही

Political update : राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांची कृष्णकुंज वर भेट, भेटीदरम्यान सकारात्मक विषयांवर चर्चा !

राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप-मनसे युतीसाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.

Political update :राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप-मनसे युतीसाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत पुणे दौऱ्यावर असताना राज यांना विचारण्यात आलं. असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

त्यावेळीं राज ठाकरे यांनी,माझ्या भूमिका आजपर्यंत मी मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असं राज ठाकरे त्यावेळीं म्हणाले.
मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? हे प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालेले आहे.
दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मनसेचे संस्थापक राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं?मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही.”
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंज येथे पोहचले होते. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले असले, तरी देखील या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवाय, राजकीय वर्तुळात देखील तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे. भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील 20 दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments