खूप काही

political Update :टास्क फोर्सची बैठक पार पडली; मंदिर मॉलवरील निर्णय काय ?

रेस्टॉरंटवरील निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

political Update : मुख्यमंत्री कोरोना काळात लावलेले निर्बंध हळूहळू शिथिल करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची टास्क फोर्ससोबतची बैठक पार पडली. या बैठकीत मंदिरं, मॉल तसेच रेस्टॉरंटवरील निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.( Mall, temple )

कोरोना काळात गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षीचे सण साधेपणाने पद्धतीनेच साजरे होतील असे बैठकीत ठरवण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट, ( Corona 3 wayvs) ऑक्सिजनची उपल्बधता तसेच लसीकरणावर देखील चर्चा करण्यात आली.

टास्क फोर्स नियमावली :

टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे असे बरेच विषयांवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या काळात सावधानता बाळगूनच निर्बंधांमध्ये शिथिलता कशी आणायची यावर चर्चा करून या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने टास्क फोर्स नियमावलीदेखील तयार करण्यात आली आहे.

बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, डॉक्टर सुहास प्रभू, उपस्थितीत होते.

मंदिरं, मॉल्स याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकमधून( Mumbai local) सामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र प्रवास करण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. याच धर्तीवर राज्यातील मंदिरं तसेच रेस्टॉरंट आणि मॉल सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, काही दिवसांमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त हॉटेल्स आणि दुकानांची वेळ वाढवून देण्यात आल्या आहेत.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments