खूप काही

Political Update : शरद पवार आणि शहायांची भेट, यामागे काय असाव कारण.

दिल्लीच्या (Delhi) वर्तुळात आज वेगळ्याचं घडामोडी घडत आहे. 

’Political Update :एकीकडे देशभरातील विरोधक केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याची आणि अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखत असताना दिल्लीच्या (Delhi) वर्तुळात आज वेगळ्याचं घडामोडी घडत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  ( Sharad pawar )यांनी केंद्रीय गृहमंत्र्यानी अमित शहा ( Amit Shah) यांची भेट घेतली आहे. पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांची देखील भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. आता या भेटीच्या चर्चेला उधाणच आलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सहकार विषयाचं स्वतंत्र खातं निर्माण करून या खात्याची जबाबदारी अमित शहांवर सोपविली आहे. सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेल्या शहांकडे या खात्याची जबाबदारी आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार असल्याचे ऐकण्यात आले आहे.(rashtrawadi, Congress)

शरद पवार आणि शहा यांची भेट ही सहकार क्षेत्रातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी झाली. भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवार म्हणाले होते. पवारांनी पंतप्रधानांना एक ट्विट ही केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी(Mamta Banerjee)  पुढाकार घेतला असून त्या नुकत्याच दिल्लीतही जाऊन आल्या आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याशी भेट झाली. मात्र, शरद पवारांशी चर्चा होऊ शकली नाही.

काही दिवसांपूर्वी शरद पवार देशपातळीवर नवा प्रयोग करत असल्याचे चित्र निर्माण झालं होतं. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. दुसरीकडे विरोधक एकत्र येत असताना पवार आणि अमित शहांना भेटत असल्याने ते कोणती नवी खेळी खेळत आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments