आपलं शहर

Politics Updates :वरूण सरदेसाईंना मिळणार युवासेनाचे प्रमुख पद, काय सांगतय सेनेचे राजकारण

आता पडद्यामागचा हा युवा नेता थेट मैदानात उतरला आहे

Politics Updates : सिव्हिल इंजिनिअर असणारे 29 वर्षीय वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ, विश्वासू सहकारी आहेत. युवसेनेच्या जडणघडणीत पडद्यामागचे शिल्पकार ‘इंजिनिअर ( engineering )’ तेच राहिले आहेत. विद्यापीठ निवडणूक असो अथवा, युवासेनेचे कॅम्पेन प्रत्येकवेळी वरुण यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आदित्य शिरोडकर, कृष्णा हेगडे यांना शिवबंधन बांधण्यात वरुण यांचाचं पुढाकार होता.

आता पडद्यामागचा हा युवा नेता थेट मैदानात उतरला आहे. वरुण सरदेसाई ( Varun sairdesai ) यांचे झंझावाती दौरे सुरू झालेत. मराठवाडा, विदर्भानंतर वरुण सरदेसाई उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापुढेही काम करणार असा दावा वरुण सध्या करत असले तरी त्यांचा हा दौरा नव्या बदलांचे संकेत देणारा आहे

वरुण यांच्याकडे युवासेना प्रमुखाची धुरा गेल्यास शिवसेनेच्या इतिहासात  ( shivsena history ) पहिल्यांदाच ठाकरे नावाव्यतिरिक्त इतरांना महत्वाचं पद मिळणार आहे. आदित्य यांचे मावसभाऊच असल्यानं घराणेशाहीचा दावा खोडला जाणार नसला तरी संघटनेला व्यापक स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे.

शिवसेनेत आदेश मानला जातो, त्यामुळे पक्ष प्रमुखांनी युवासेना( yuvasena ) प्रमुखपदाच्या नव्या नावाची घोषणा जरी केली तरी वरुण सरदेसाई यांना आदित्य ठाकरे यांच्यासारखे प्रेम, मिळणार का? आदित्यसारखे( Aditya Thackeray) वरुण यांचे आकर्षण तरुणांना राहणार का? पक्षातील नेते नवं नेतृत्व स्वीकारणार का? असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments