राजकारण

घंटानाद करा, पण आमचा नको; राज ठाकरेंना रोखठोक उत्तर… | Raj Thackeray’s reply to Kishori Pednekar

31 ऑगस्ट रोजी मुंबईत दहीहंडीमुळे वातावरण तापलं होतं, मनसेने दहीहंडी फोडून राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधांना केराची टोपली दाखवली होती.

31 ऑगस्ट रोजी मुंबईत दहीहंडीमुळे वातावरण तापलं होतं, मनसेने दहीहंडी फोडून राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधांना केराची टोपली दाखवली होती. अनेक मनसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी राज ठाकरे यानी एक पत्रकार परिषद घेतली होती, यात बोलताना त्यांनी बंद असलेल्या मंदिरांबद्दलही एक आपलं मत व्यक्त केलं होतं. (Raj Thackeray’s reply to Kishori Pednekar, controversy over starting temples)

मंदिरे सुरु झालीच पाहिजे, जर मंदिरे लवकरात लवकर सुरु होणार नाहीत, तर मनसेकडून राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र याला उत्तर म्हणून मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.

मंदिरे सुरु करण्यासाठी तुम्ही घंटा नाद करा, नाहीतर आणखी काही करा, मात्र आमचा नाद करू नका, असा इशारा किशोरी पेडणेकरांनी मनसेला दिला आहे. लोकांच्या भावनेचा विचार करतो, हे काहीजण दाखवून देतात, मात्र विरोधकांनी लोकांच्या भावनेचा विचार करण्यापेक्षा लोकांच्या जीवाचा विचार करावा, जेव्हा कोरोना वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जाऊन बसतात, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी लोकांची गर्दी करून दहीहंडी फोडण्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीवर प्रतिक्रिया देताना पेडणेकरांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचंदेखील उदाहरण दिलं आहे. कोव्हीडच्या आधीचा मनसेच्या एका नेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत होता, तेव्हा लोकांना रुग्णालयात जागा मिळत नाही, म्हणून ते रडत होते आणि आता पुन्हा लोकांना गर्दी करण्यासाठी सांगत आहेत, त्या नेत्याचं तेव्हाचं वागणं खरं होतं की आताचं वागणं खरं आहे, असा सवालही नाव न घेता किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडे यांना विचारला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments