खूप काही

RBI bank : 1 ऑक्टोंबर एटीएम ऑपरेटरसाठी RBI चे नवे आदेश, पैशे काढताना काय होणार त्रास

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना आता एटीएममध्ये वेळोवेळी वेळेवर पैसे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RBI bank : एटीएममध्ये रोख पैशांच्या उपलब्धतेबाबत लक्ष ठेवण्यासाठी सर्व बँकांच्या अध्यक्षांना, व्यवस्थापकीय संचालकांना आणि सीईओंना त्यांची याबाबतची यंत्रणा मजबूत करण्याबाबत सुचना दिल्या गेल्या आहेत. आरबीआयने याबाबतच्या एका पत्रात म्हटलंय की, रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना आता एटीएममध्ये वेळोवेळी वेळेवर पैसे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जेणेकरून एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकाची हिरमोड आणि गैरसोय होणार नाही. असं घडलं तर त्या बँकेला दंडाला सामोरे जावं लागणार आहे.

RBI कडून असा निर्णय घेण्यात आला आहे की बँका/ व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLO) एटीएममध्ये रोख रक्कमेच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवतील आणि कॅश-आऊट्स टाळण्यासाठी वेळोवेळी वेळेवर भरपाई करण्यासाठीच्या त्यांच्या यंत्रणा अधिक मजबूत करतील.’ असं प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक यांनी या आदेशात म्हटलंय.

बरेचदा 10,000 दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) मध्ये अशाच प्रकारच्या रोख रकमेसाठी, विशिष्ट डब्ल्यूएलएची रोख आवश्यकता पूर्ण करणाऱ्या बँकांना दंड आकारला जाईल. मात्र, बँक आपल्या विवेकबुद्धीनुसार, डब्ल्यूएलए ऑपरेटरकडून दंड वसूल करू शकते, असं आरबीआयने म्हटलंय.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments