RBI rules : जानेवारी 2022 पासून बदलणार पेमेंटच्या पद्धती, जाणून घ्या काय आहेत नवीन बदल..
RBI डेटा स्टोरेज पॉलिसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसह तयार आहे, जे जानेवारी 2022 पासून लागू होऊ शकते.

RBI rules : वास्तविक, जानेवारी 2022 मध्ये, पेमेंटशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलू शकतो आणि प्रत्येक वेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर टाकावा लागेल.डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक 16 अंकी आहे आणि प्रत्येकजण तो लक्षात ठेवू शकत नाही. बहुतेक लोकं एकापेक्षा जास्त कार्ड वापरतात. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI च्या नवीन नियमांनुसार तुम्हाला कार्ड क्रमांक लक्षात ठेवावा लागेल.
पेमेंट गेटवे कंपन्या कार्ड डिटेल्स स्टोअर करू शकणार नाहीत
नवीन नियमांनुसार, ऑनलाइन मर्चंट, ई-कॉमर्स वेबसाइट आणि पेमेंट एग्रीगेटर्सना ऑनलाइन ग्राहक कार्डचे डिटेल्स स्टोअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ असा की, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुमचे कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) सेव्ह करण्याऐवजी तुम्हाला तुमचे सर्व कार्ड डिटेल्स जसे की नाव, कार्ड नंबर आणि कार्ड व्हॅलिडिटी एंटर करावी लागेल.
सध्या 16 अंकी कार्ड क्रमांक पुन्हा पुन्हा टाकावा लागत नाही
सध्या,जर तुम्ही दुसऱ्यांदा कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवर पेमेंट केले तर तुम्हाला फक्त CVV आणि वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP टाकावा लागेल.RBI डेटा स्टोरेज पॉलिसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसह तयार आहे, जे जानेवारी 2022 पासून लागू होऊ शकते. सुधारित नियमांमध्ये पेमेंट एग्रीगेटर्स आणि अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स सारख्या मर्चंटसना त्यांच्या सर्व्हर किंवा डेटाबेसवर ग्राहक कार्डाची माहिती साठवण्यास मनाई आहे.
हे ही वाचा :