sanjay jadhav : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरून, शिवसेना-राष्ट्रवादी फुट…
शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जालनातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगलीच जुंपल्याचं दिसून येत

sanjay jadhav : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरुन शिवसेना- राष्ट्रवादीत वाद सुरु झाला आहे.घनसावंगी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय जाधव यांनी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत शिफारस केल्याचे सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रवादी हे प्रकरण उठविले, असे सांगून त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर ही टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ, असे संजय जाधव यांनी वक्तव्य देखील केले होते.
भावना अनावर होत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं आणि सहन करायचं. जेव्हा माकडीन बुडायला येते तेव्हा ती लेकरालाही पायाखाली घेते, मग आम्हीही कधीही राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ शकतो’, असं घणाघाती विधान शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जालनातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. असं संजय जाधव म्हणाले होते.
जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल या रुजू होताच कारवाई भीतीने कुंडेटकर यांनी ९ ऑगस्ट रोजी तो फेरफार रद्द केला. या प्रकरणात संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खासदार जाधव यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे, असेही देशमुख म्हणाले. आता शासकीय कर्मचाऱ्यांनीच खासदार जाधल यांच्या दबावामुळे चुतीचा फेरफार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते आता राजकीय संन्यास घेणार का?, असा सवाल राष्ट्रवीदीचे तालुकाध्यक्ष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा :
- Mumbai update : मुंबई विद्यापीठाचे पदवी प्रवेशासंदर्भात वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख…..
- Scholarship Examination : शिक्षण विभागाची पूर्वसूचना न देताच, आठवी व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द….
- Bollywood Trending : ‘जाने मेरी जानेमन’ गाण्याचा लहान कलाकार ,सिंगर बादशासोबत व्हायरल