Devdas : काय होता देवदासचा इतिहास पहा पूर्ण माहिती.
यापूर्वीही केएल सैगल आणि दिलीप कुमार यांच्यासोबत दुसरा 'देवदास' चित्रपट बनवला होता

Devdas :12 जुलै 2002 रोजी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची संकल्पना शरतचंद्र चट्टोपाध्याय ( shrtchindra ) यांच्या कादंबरीतून घेण्यात आली आहे. त्याच नाव होतं ‘देवदास’. यापूर्वीही केएल सैगल आणि दिलीप कुमार यांच्यासोबत दुसरा ‘देवदास’ चित्रपट बनवला होता. मात्र या देवदासमध्ये काही खास होते, शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच देवदासमधून एकत्र काम करणार होते.
असं म्हटलं जातं की, भन्साळी शाहरुखला कथन करताना सांगितलं होतं की हा चित्रपट तेव्हाच बनवला जाईल, जेव्हा तो हो म्हणेल. शाहरुखने या चित्रपटास सहमती दिली आणि अनेक अडचणींनंतर चित्रपटाचे काम सुरू झाले. त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट देवदास ठरला होता. चित्रपट सुपर डुपर हिट ठरला, प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वात जास्त पैसा कमवून देणारा हा एकच चित्रपट त्याकाळी बनला होता.
शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, किरण खेर, स्मिता जयकर, टिकू तलसानिया आणि मिलिंद गुणाजी स्टारर हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित होता. ( Sharukhan , madhuri dushit , eashiwarya )संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या बराच मुलाखतींमध्ये सांगितले की, वडील निर्माता होते, परंतु माझे कधीच त्यांच्याबरोबर जमले नाही. अडचणी निर्माण होत होत्या, वडील मद्यपानाच्या आहारी गेल्याने अनेक प्रश्न उभे राहिले होते.
View this post on Instagram
सुरुवातीला घरातील आर्थिक परिस्थिती देखील बिकटच होती, मुलांचे पोट भरण्यासाठी हातभार म्हणून आई, साबण विकून मुलांना वाढवत होती. नंतर वडिलांना लिव्हरचा आजार सुरू झाला. मग कोमातून मृत्यूकडे जाण्यापूर्वी वडिलांनी आईकडे हात पुढे केला. ती पहिली आणि शेवटची वेळ आपल्या पत्नीवर प्रेम व्यक्त करण्याची होती. लीला त्या क्षणाची किती वर्षे वाट पाहत होती, हे माहित नाही; पण आई, लीलाचा (lila) हात पकडताच संजयच्या वडिलांचा मृत्यू झाला.
संजय सांगतात की, त्या दोन हातांचे वेगळेपण आठवते. संजय यांना भविष्यात अशा कथेवर चित्रपट बनवायचा होता. त्यांनी शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे ( shrtchindra chatopadhyay) ‘देवदास’ वाचण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या पुढील चित्रपटासाठी शोधत असलेला घटक सापडला. या चित्रपटाच्या शेवटी देवदास अस्पष्ट डोळ्यांनी तो पारुकडे धावताना दिसत आहे. संजय यांनी या चित्रपटात त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचा वापर केला आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माता भरत शहांनी चित्रपटात पैसे गुंतवले होते, मात्र अंडरवर्ल्डच्या संबंधित त्यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी अटकेवेळी शहाने 11 चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले होते, अशी माहिती दिली. यापैकी एक होता सलमान खान, राणी मुखर्जी ( rani Mukerji ,salman khan) आणि प्रीती झिंटा स्टारर ‘चोरी चोरी चुपके चुपके’.(chori chori chupke chupke ) पोलिसांना नाझीमकडून कळले की, अंडरवर्ल्डचे पैसे भरतच्या निर्मिती करणाऱ्या चित्रपटांमध्ये गुंतवले जात आहेत. ‘देवदास’च्या शूटिंगसाठी दररोज 7 लाख रुपये खर्च होत होते.भरतच्या अटकेनंतर ‘देवदास’चे शूटिंग प्रथम रद्द करण्यात आले. भन्साळींना काळजी वाटत होती, की चित्रपटसृष्टी चालेल की नाही, पण भरत शहाही अट्टल होते. ( Shaha attal)
तुरुंगात आपले निर्दोषत्व सिद्ध केल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की ‘देवदास’चे काम थांबू नये, यासाठी भरत शहा यांनीच देशातील प्रसिद्ध वकिलांवर ‘देवदास’ (davdas)च्या बजेटइतकाच पैसा खर्च केला होता. देवदास’ वर त्याकाळातील 50 कोटींपेक्षा जास्त खर्च आला होता.
Devdas will always b special.Thank u Bhansali… the beautiful ladies & every1.Late nites..long shoots &so much love. pic.twitter.com/aPnLBQ8pyy
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 11, 2016