अर्थकारण

Share Market : शेअर बाजारात ऐतिहासिक उसळ तर इलेक्ट्रॉनिक , टेक्नॉलॉजीत मोठा नफा

काही महिन्यातच शेअर बाजाराने पुन्हा उसळी घेतली आहे.

Share Market : कोरोना काळात मागील वर्षी शेअर बाजार ढासळले होते. त्यानंतर काही महिन्यातच शेअर बाजाराने पुन्हा उसळी घेतली आहे. सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्या ऐतिहासिक उच्चांकीच्या जवळपास व्यवहार करत असून जबरदस्त तेजीमुळे काही शेअर्स हे मल्टीबॅगर (multy share)शेअर बनले आहेत.

टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिन्सर्व, नेस्ले, एअरटेल, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा या कंपन्यांनी सोमवारी तेजीचे नेतृत्व केलेले आहे.(tcs, Baja financial, teck mahindra,airtel )

गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात खरेदी-विक्रीचा लाटा चालू आहेत.गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई झाली आहे.इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या व्यवसायातील डिक्सन टेक्नॉलॉजीस या कंपनीने फक्त तीन वर्षात गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. तीन वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीची किंमत जवळपास 10 लाख रुपये झालेली आहे.

माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू व बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक सव्वा टक्‍क्‍यांपर्यंत वाढले तर धातू, वाहन, रिअल्टी, आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. मुख्य निर्देशांकात वाढ होत असली तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅप दिड टक्‍क्‍यापर्यंत खाली कोसळले आहे. गेल्या आठवड्यातही हे निर्देशांक बरेच कमी झाले होते.( Election,oil, air )

मुंबई शेअर बाजारात डिक्सन टेक्नॉलॉजीसचा शेअर 3,904.95 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. सेन्सेक्‍स 226 अंकांनी वाढून 55,555 अंकांवर बंद झाला .त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.28 टक्‍क्‍यांनी म्हणजे 45 अंकांनी वाढून 16,496 अंकांवर बंद झाला.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments