फेमस

Bollywood Trending : ‘जाने मेरी जानेमन’ गाण्याचा लहान कलाकार ,सिंगर बादशासोबत व्हायरल

जाने मेरी जानेमन...'. सर्वत्र या गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत

Bollywood  Trending : या काळात इंस्टाग्रामवरील  रिल्सवर मोठ्या प्रमाणात चर्चेत असणारा व्हिडिओ म्हणजे ‘जाने मेरी जानेमन…’. सर्वत्र या गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.( Viral video)

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात राहणारा सहदेव दिर्दो Sahdev Dirdo.गरीब घरातील एक लहान मुलाने चेहऱ्यावर शुन्य भाव ठेवून हे गाणं गायले आणि वाऱ्याच्या वेगासारखा त्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांमध्येच सहदेवची चर्चा सुरू तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला आहे.

सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो.अनपेक्षितपणे प्रसिद्धीझोतात आलेला सहदेव दिरदो आता थेट सेलिब्रिटींसोबत मोठ्या पडद्यावर झळकला आहे.

सेलिब्रिटी रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) यांच्या सोबत काम करण्याची सहदेवला मोठी संधी दिली असून, त्याच्यासोबत एक म्युझिक व्हिडीओ देखील बनवण्यात आला आहे.

सहदेवचा एकदम वेगळा लूक आणि अंदाज या गाण्याच्या निमित्तानं सोशल युजर्सना पाहायला मिळतो . एरव्ही शांत दिसणारा सहदेव या गाण्याच्या निमित्तानं मजेशीर अंदाजात दिसत आहे. बादशाहनं लिहिलेल्या या गाण्याच्या नव्या वर्जनला हितेननं संगीत दिलं आहे. सहदेव दिर्डो रातोरात स्टार बनला आहे.सहदेवला संधी दिल्याबद्दल बादशाहवर अनेकांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दुसरीकडे एमजी कंपनीने (AMG company )  सहदेव दिर्दो,याला 21 हजार रुपयांचा चेक सन्मानित केला आहे.एमजी कंपनीच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, त्यांच्या कंपनीने सहदेवला कोणतीही कार भेट दिलेली नाही . सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ बनावट असून हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments