Sport News :बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत तीन टी20 सामने जिंकले.
पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे

Sport News : इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली आहे.बांगलादेशच्या ( Bangladesh )क्रिकेट संघानं नवा इतिहास घडवून आणला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला( Australia) हरवत सलग तीन टी 20 सामने जिंकत विजय पटकाविला आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. ढाका येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत बांगलादेशनं हा इतिहास ( history) नोंदवला आहे.
सोबतच बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग तीन टी 20 सामने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्यात बांगलादेशनं ऑस्ट्रेलियासमोर 128 धावांचे ध्येय ठेवले होते. महमुदुल्लाहने चार चौकारांच्या जोरावर 52 धावांची खेळी करत 127 धावांपर्यंत पोहोचवले. महमुदुल्लाहला यावेळी. महमुदुल्लाहने एकतर्फी किल्ला लढल्या सारखे अर्धशतकी खेळी पार पाडली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने यावेळी तीन विकेट्स तर जोश हेझलवूड आणि अॅडम झाम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाला 20 षटकांमध्ये केवळ 117 धावा करता आल्या.तसेच ऑस्ट्रेलियाची स्थिती 1 बाद 8 अशी झाल्यानंतर बेन मॅकडरमॉट आणि मिचेल मार्श यांची चांगली भागीदारी रचल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी 63 धावांची भागीदारी केली. पण यावेळी बेन बाद झाला आणि ही जोडी फुटली. बेनने 35 धावा केल्या.
तर ऑस्ट्रेलियाकडून मार्श वगळता कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 51 धावा केल्या. मार्श बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना निसटला. ऑस्ट्रेलियाला 20 षटकांमध्ये 117 धावा करता आल्या आणि बांगलादेशने 10 धावांनी विजय साकारला आहे.
🙏#BANvAUS https://t.co/dOJ6fillNn
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 6, 2021