अर्थकारण

Share market : फक्त 30 पैशांच्या शेअर्स ने केली लाखोंची कमाई, जाणून घ्या कशी…

तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास 82 लाख रुपये झाले असते.

Share market : भारतीय शेअर बाजार (Share Market) सध्या नवनवीन उच्चांकी पातळी नोंदवत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने हा चमत्कार केला आहे.शेअर बाजाराच्या या तेजीत अनेक कंपन्यांच्या शेअर्सने दमदार कामगिरी केली आहे. स्मॉलकॅप श्रेणीतील अनेक शेअर्सने तर छप्परफाड परतावा दिला आहे.

इतकेच कशाला मागील फक्त दोन महिन्यात हा शेअर सहा पट वाढला आहे. 2 जुलै 2021 ला प्रोसीड इंडियाचा शेअर 5.35 रुपयांच्या पातळीवर होता. त्यानंतर या शेअरने जबरदस्त तेजी दाखवत सहापट वाढ नोंदवली आहे. अगदी ऑगस्ट 2021च्या सुरूवातीला हा शेअर 12.85 रुपयांना मिळत होता. सध्या प्रोसीड इंडियाच्या या शेअरची किंमत 24 .90 रुपये आहे. म्हणजेच फक्त तीन आठवड्यात या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. प्रोसीड इंडियाचे भागभांडवल म्हणजे मार्केट कॅपिटल 370.11कोटी रुपये आहे.

एका मायक्रोकॅप म्हणजे अतिशय छोट्या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे प्रोसीड इंडिया लि.प्रोसीड इंडियाच्या शेअरने मागील फक्त ९ महिन्यात, छप्परफाड शब्द छोटा वाटावा इतका म्हणजे तब्बल 8,200 टक्के परतावा दिला आहे.

प्रोसीड इंडियाचा शेअर मायक्रोकॅप श्रेणीतील आहे. म्हणजेच हा अतिशय छोटा शेअर आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा शेअर फक्त 30 पैशांच्या पातळीवर होता. मागील वर्षभरात या शेअरच्या किंमतीने गगनभरारी घेतली आहे. सध्या या शेअरची किंमत 24.90 रुपये झाली आहे. प्रोसीड इंडियाच्या शेअरने फक्त 9 महिन्यात छप्परफाड म्हणजे जवळपास 8,200 टक्के परतावा दिला आहे.

त्यामुळे प्रोसीड इंडियाचा शेअर हा मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. प्रोसीड इंडियाचा शेअर नोव्हेंबर 2020 मध्ये 30 पैसे प्रति शेअरच्या पातळीवर होता. सध्या हा शेअर मुंबई शेअर बाजारात 24.90 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. छोट्याशा गुंतवणुकीद्वारे देखील या शेअरमधून मोठी कमाई झाली आहे.

म्हणजेच जर वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास 82 लाख रुपये झाले असते. किंवा जर तुम्ही या शेअरमध्ये फक्त 10,000 रुपये गुंतवले असते तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 8 लाख 20,000 रुपये झाले असते.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments