SUBHASH DESAI HELP : दुर्गम भागातील पूरग्रस्तांसाठी सुभाष देसाई यांची मदत…
SUBHASH DESAI HELP : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नैसर्गिक आपत्ती,महामारी अशा संकटांच्या काळात ज्या दुर्गम भागामध्ये लोकांची आरोग्य हानी झाली आहे

SUBHASH DESAI HELP : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नैसर्गिक आपत्ती,महामारी अशा संकटांच्या काळात ज्या दुर्गम भागामध्ये लोकांची आरोग्य हानी झाली आहे,तेथील लोकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण करावे असा उपदेश कॉर्पोरेट कंपन्यांना दिला आहे.
दहिसर येथील मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड केअर केंद्रामध्ये हनिवेल कंपनीच्यावतीने सुविधायुक्त अतिदक्षता विभागाची स्थापना करताना याबद्दलची माहिती देसाई यांनी दिली आहे. देसाई यांच्या सोबत हनिवेल कंपनीचे प्रमुख आशिष गायकवाड, मुंबई महानगरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कोकणी हेदेखील उपस्थित होते.
केंद्रामध्ये व्हेंटिलेटरस,बीआयपी,मशिन्स, मॉनिटर्स,एक्सरे मशिन्स सोबतच इसिजी मशिन्स इत्यादी मशिन्स अतिदक्षता केंद्रामध्ये असणार आहेत.
यापुढील काळामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीच्या काळात कॉर्पोरेट कंपन्यांची गरज भासेल असे देसाई म्हणाले आहेत.
हनिवेल कंपनीने कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाला अतिशय मोलाचे सहकार्य केले होते, म्हणूनच दहिसर येथील जम्बो कोविड केंद्रामध्ये हनिवेल कंपनीने अतिदक्षता विभागाची स्थापना केली आहे.