फेमस

Sunil Shetty : फिल्मी दुनियेपासून सुनील शेट्टी दूर, पण या व्यवसायात कमवतो बक्कळ पैसा

अनेक बॉलिवूड अभिनेत्यांमधून सुनील शेट्टीने आपले एक आगळेवेगळे नाव कमावले आहे

Sunil Shetty : अनेक बॉलिवूड ( Bollywood) अभिनेत्यांमधून सुनील शेट्टीने आपले एक आगळेवेगळे नाव कमावले आहे. अभिनेता सुनील शेट्टीचा आज 60 वा वाढदिवस आहे.

11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकात सुनील शेट्टीचा जन्म झाला. सुनीलने ‘बलवान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रातमध्ये पदार्पण केले.

धडकन , हेरा फेरी ( Dhadkan ,Hera pheri) असे चित्रपटात प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे. अभिनेता काही काळानंतर इंडस्ट्री पासून लांब होऊन एक अभिनेता म्हणून नाही तर एक उद्योजक म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.सुनील शेट्टी आज कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे. अभिनेता सुनील यांचे एक रेस्टॉरंट असून त्याची खासियत जगभरात उडुपी (uddipi hotel)पाककृती म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे कपड्यांचे बुटीक देखील आहे.

https://www.instagram.com/p/CRZOIhbBbBh/?utm_medium=copy_link

गाड्यांच्या बाबतीत पाहाच तर टोयोटा प्राडो, लँड क्रूझर, जीप रॅंगलर सारख्या गाड्या त्याचाकडे आहेत. एवढेच नाही तर सुनील शेट्टीचे मुंबईतील पॉश परिसरात स्वतःचा आलिशान बंगला देखील आहे.

दिलवाले, मुंगी, मोहरा, गोपी किशन, कृष्णा, रक्षक, सीमा, भाई, हेरा फेरी, धडकन इत्यादी चित्रपटांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे.केवळ अँक्शन चित्रपटच नाही तर कॉमेडी, रोमॅन्टीक आणि विलन अशा चित्रपटांतही कामे केलेली आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची जोडी खूप फेमस होती .अनेक चित्रपटात ते दोघं एकत्र ही पाहायला मिळाले.

(Akshay Kumar and Sunil Shetty work together)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments