खूप काहीनॅशनल

Tata Motors :सामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करणार, टाटा मोटर्सचा नवा प्रोजेक्ट, पेट्रोल डिझेलची गरज नाही

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी खूप वाढत आहे.

  1. Tata Motors : कंपन्या सतत नवनवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. देशातील प्रमुख कार कंपनी टाटा मोटर्स देखील आपली लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक कार Tata Altroz आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहेत. भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी खूप वाढत आहे. आज लोक पेट्रोल आणि डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक कार चालवण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु इलेक्ट्रिक कारची किंमत अजूनही ग्राहकांसाठी परवडणारी नाही . त्यामुळे भारतीय ( India automobiles) ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने स्वस्त दरात आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

टाटा मोटर्सची नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) सध्या भारतात खूप विकली जात आहे, नेक्सन ईव्ही गाडी तुम्ही एका चार्जमध्ये 312 किलोमीटरपर्यंत चालवू शकता.त्याची बॅटरी रेंज 250 किमी आहे. Tata Altroz इलेक्ट्रिकला केंद्र सरकारच्या FAME II स्कीमचा लाभ मिळेल आणि ही कार 10 ते 12 लाख रुपयांदरम्यान लाँच होईल अशी शक्यता आहे. टाटा टिगोर इलेक्ट्रिक 31 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होणार आहे. ही टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारांपैकी एक आहे. नवीन टाटा टिगॉर EV (New Tata Tigor EV) सिंगल चार्जवर 350 किमी पर्यंतची मायलेज देऊ शकते.

टाटा मोटर्सने नवीन टिगोरचा एक टीझर व्हिडिओ देखील लॉन्च केला, ज्यात कारचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये उघड झाली. व्हिडिओनुसार, Ziptron EV तंत्रज्ञान टाटा टिगोर EV मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक SUV टाटा नेक्सॉन EV सारखे (Tata Nexon EV) वापरले गेले आहे. झिपट्रॉनवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाबाबत टाटा मोटर्सचा दावा आहे की

वैशिष्ट्ये :

असा दावा केला जात आहे की केवळ 5.9 सेकंदात ते 60 किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. टाटा मोटर्स 8 वर्षांच्या बॅटरीचे आयुष्य असणार आहे.टाटाच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 55kW इलेक्ट्रिक मोटर आणि 26kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक असेल, जे 74bhp (55kW) आणि 170Nmपर्यंत टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. फास्ट चार्जिंग पॉइंटवर, त्याची बॅटरी फक्त एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते. त्याचवेळी, घरी चार्ज करण्यासाठी 8.5 तास लागतील.

मास्टरस्ट्रोक पेक्षा टाटा मोटर्सच कमी नाही. यामुळे केवळ टाटाची विक्रीच वाढणार नाही, तर इतर वाहन उत्पादकांनाही त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किंमती कमी करण्यास भाग पाडले जाईल. टाटाची इलेक्ट्रिक कार लाँच होताच अनेक कंपन्याचा तोटा होणार आहे परंतु , ग्राहकांना याचाच फायदा होईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments