राजकारण

दी मुमेंट ऑफ वरुण सरदेसाई, मेन स्ट्रीममध्ये कसे? सेनेचा पाहुणा ते कार्यकर्ता…. | Varun Sardesai

वरुण सरदेसाईंचं नेमकं काम काय, ते इतक्या चर्चेत का, शिवसेनेकडून त्यांना इतकं महत्त्व का, भाजपच्या मेन टार्गेटवर वरूण सरदेसाई का?

Varun Sardesai :| केंद्रीय लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या एका वक्तव्यामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला वाद संपूर्ण देशभर परसरला, मात्र या सगळ्यात अजून एक नाव सगळ्यांच्या केंद्रस्थानी आलं, ते म्हणजे वरूण सरदेसाई. वरुण सरदेसाईंचं नेमकं काम काय, ते इतक्या चर्चेत का, शिवसेनेकडून त्यांना इतकं महत्त्व का, भाजपच्या मेन टार्गेटवर वरूण सरदेसाई का? हे आपण आज जाणून घेणार आहोत. (The Moment of Varun Sardesai, How in Main Stream? Relative to Activist)

काय आहे नातं?

वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांच्या मावशीचे पुत्र आहेत. म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी, रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. लहाणपणापासून ठाकरे कुटुंबांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहणे असो, किंवा त्यांच्या अनेक गोष्टींमध्ये मदत करणे असो, वरुण सरदेसाई आपली सगळी जबाबदारी चोख पार पाडतात.

शिवसेनेसह युवासेनेत कोणती जबाबदारी?

वरुण सरदेसाईंची शिवसेनेतील फायर ब्रँड नेता म्हणूनही खास ओळख आहे. ते जितके संयमी आहेत, तितकेच ते आक्रमक असल्याचंही त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या किंवा युवासेनेच्या अनेक महत्त्वाच्या अॅक्टिव्हिटींमध्ये ते सगळ्यात समोर असतात, हे नक्की. सरदेसाई आक्रमक स्वभावाचे आणि वेल मॅनेज्मेंट असल्यामुळे सेनेमध्ये येताच त्यांच्याकडे युवासेनेचे सचिवपद देण्यात आले. महाराष्ट्रात युवासेना पोहोचवणे असो किंवा युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेला बॅक सपोर्ट देणे असो, वरुण सरदेसाई आपली भूमिका स्पष्ट बजावतात.

राजकारणाच्या चर्चेत केव्हापासून?

15 मार्च 2020 रोजी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत वरुण सरदेसाई यांच्यावर काही आरोप केले होते. काही मंत्र्यांप्रमाणेच वरुण सरदेसाईंना ‘वाय +’ सुरक्षा देणे, सचिन वाझेंना फोन करून खंडणी मागणे, असे अनेक आरोप नितेश राणेंनी सरदेसाईंवर केले होते. (Nitesh Rane twit on Varun Sardesai)

याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरुण सरदेसाई हे मीडियाच्या समोर होते. आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी पहिली मागणी सरदेसाईंनी केली होती, त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा मंत्रिपदाचा प्रवास सुरु झाला होता.

2017 आणि 2019 च्या निवडणुकांची काहीशी जबाबदारीही सरदेसाईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती, श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराची जबाबदारी 2014 मध्ये सरदेसाईंच्या खांद्यावर होती. ऑगस्ट 2020 मध्ये सुप्रिया सुळेंनी एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये ‘माय सीकेपी मुमेंट-पाटणकर, सरदेसाई, ठाकरे, सुळे’ असं कॅप्शन देण्यात आलं होतं. (Supriya Sule twit on Varun Sardesai)


मनसेशी वाद असो, किंवा आशिष शेलार, प्रविण दरेकरांसह इतर भाजप नेत्यांचे ट्विट असो, वरुण सरदेसाई हे नेहमी मेन स्ट्रीममध्ये असस्याचं पाहायला मिळालं आहे. खंडणी प्रकरणात अनेकदा मनसेने वरुण सरदेसाईंचं नाव घेतल्याचंही पाहायला मिळतं.

सरदेसाईंना एवढं महत्त्व का?

भाजपकडून असो किंवा मनसेकडून टीका करणे असो, आदित्य ठाकरे यांच्यानंतर वरुण सरदेसाईंना मेन टार्गेट केलं जातं, काही पत्रकारांचं यावर वेगवेगळं म्हणणं आहे. काहींच्या मते वरुण सरदेसाई हे ठाकरे घराण्याशी संबंधीत असल्यामुळे त्यांच्यावर टीका होते, तर काहींच्या मते आदित्य ठाकरे यांच्या जास्त जवळ असल्याने आणि युवासेनेचे सचिव असल्याने त्यांच्यावर जास्त टीका केली जात असल्याचंही म्हटलं जातं. मात्र या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवल्यास तरुणांमध्ये असलेली त्यांची ओळख आणि दांडगा संपर्क, हेदेखील एक महत्त्वाचं कारण होऊ शकतं, त्यांच्यावर टीका होण्याचं.

काही मीडिया हाऊसच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यानंतर वरुण सरदेसाई हे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते माणले जातात, मात्र येणारा काळ सांगू शकेल की वरुण सरदेसाई, हे शिवसेनेच्या कितपत जवळ जाऊ शकतात.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments