हेल्थ

Corona update : महाराष्ट्रासह केरळमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यूची शक्यता, केंद्र सरकारचे धक्कादायक संकेत…

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येबाबत गुरुवारी केंद्रीय गृह सचिवांनी महाराष्ट्र आणि केरळच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

Corona update : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येबाबत गुरुवारी केंद्रीय गृह सचिवांनी महाराष्ट्र आणि केरळच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की,महाराष्ट्र व केरळ राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.पुन्हा एकदा केरळ व महाराष्ट्रात जास्तीत जास्त कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः गेल्या तीन दिवसांत कोरोनाच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे,म्हणूनच केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना रात्रीचा कर्फ्यू लावण्यासाठी विचार करण्याचा सल्ला दिला आहे.The possibility of another night curfew in Kerala, including Maharashtra, is a shocking sign from the central government

केंद्रीय गृह सचिवांबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान, गृह सचिवांनी दोन्ही राज्यांना सांगितले की ज्या भागात केसेस जास्त वाढत आहेत तेथे कोरोनाला वाढण्यापासून थांबवण्यासाठी संपर्क शोधणे, लसीकरण मोहीम तीव्र करणे तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

याशिवाय, त्यांनी दोन्ही राज्य सरकारांना रात्रीचा कर्फ्यू लावण्याच्या शक्यतेवर विचार करण्यास सांगितले आहे. गृह सचिवांनी केरळ व महाराष्ट्र सरकारला लसीकरणाची मोहीम वेगवान करण्यास सांगितले आणि लसींची कमतरता असल्यास लसींची मागणी करण्याचे आदेश दिले आहेत. गृह सचिव म्हणाले की जरी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना दोन्ही लसींच्या मात्रा मिळाल्या आहेत, परंतु तरीही सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

येत्या सणासुदीच्या काळात नियमांचे पालन करण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. केंद्राने राज्यांना सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालावी तसेच सणांच्या वेळी मोठ्याप्रमाणात गर्दी होऊ देऊ नये असे सांगितले आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या केसेस आणखी वाढल्या,तर पुन्हा एकदा निर्बंधांचे दिवस परत येऊ शकतात.

   हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments