खूप काही

Political Update : मंत्रीपद कुणाच्या बापाची मिरासदारी नाही, वडेट्टीवार भडकले…

पहिल्या बाकावर कोण हे सगळ्यांना माहिती आ

Political Update :जालना जिल्ह्यातील दोदडगाव येथे मंडलस्तंभ अभिवादन आणि सामाजिक न्याय मेळाव्यात विजय वडेट्टीवार बोलत होते.सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करत नाही.

भजांसोबत ( front bjp )मिरची होती आणि त्यामध्ये कांदे होते याचीच तारीफ करतो. ते तुमच्या ताटातील काढून घेत आहेत याचा विचार करणार की नाही? मंत्रीपद काही कुणाच्या बापाची कायमची मिरासदारी नाही. आज आहे उद्या नाही, ज्यांच्यामुळे मंत्रीपद मिळाले त्या समाजासाठी आपण काय करतो हे महत्वाचे आहे. सत्ता कुणाकडे कायम नसते. याची अनेक उदाहरणं आहेत.”

ते कधी-कधी म्हणतात ओबीसींच्या  ( OBC)प्रश्नांवर सगळे मिळून लढू! नाही तरी काय? शिवसेना सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण? भाजपा सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण? काँग्रेस सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण आणि पहिल्या बाकावर कोण हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आम्ही कुठे आहोत? तो मटन खातोय आणि तुम्ही आम्ही भजे खाण्यातच खूश.

ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढायला शिकाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ओबीसी हा मजबुतीने उभा झालाय हे चित्र रंगेल, ती ताकद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून निर्माण करायची आहे.” असं खळबळजनक विधान राज्याचे इतर मागासवर्गीय कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल (8 ऑगस्ट रोजी) केलं.

माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे ( babanravo Thane) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होतेयावेळी वडेट्टीवारांनी चौफेर टोलेबाजी करताना भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrshekhar bavnkule ) यांचा उल्लेख करत म्हटले की, “ते ओबीसीसाठी रोज लढताना दिसतात. ओबीसी लढ्याबद्दल ते माझी तारीफ करतात, मी देखील कधी त्यांची तारीफ केली पाहिजे. असे विजय वडेट्टीवार बोलले.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments