RPF Action : ग्लॅमरसच्या नादात पळून गेलेल्या मुलींची सुटका, RPF जवानांचं मिशन सक्सेस
मुंबईसह इतर ठिकाणाहून हरवलेल्या किंवा घरातून पळून गेलेल्या अनेक मुलींची RPF पोलिसांनी सुटका केली आहे.

RPF Action : मुंबईसह इतर ठिकाणाहून हरवलेल्या किंवा घरातून पळून गेलेल्या अनेक मुलींची RPF पोलिसांनी सुटका केली आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने तब्बल 477 हरवलेल्या किंवा घरातून पळून गेलेल्या मुलांना शोधलं आहे आणि त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधिन केलं आहे.
मध्य रेल्वेच्या सुरक्षादलाने ही कामगिरी केली आहे. गेल्या 7 महिन्यांत मध्य रेल्वेवच्या स्थानकांवरून 477 हरवलेल्या किंवा पळून गेलेल्या मुलींना शोधलं आहे, आणि पालकांशी स्वाधिन केलं आहे. यामध्ये 310 मुले आणि 167 मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हे मिशन करण्यात आलं आहे.
पळून गेलेल्या बऱ्याच जणांची काही कारणे आता समोर आली आहेत. काहीजण भांडण करून, काहीजण कौटुंबिक समस्यांमुळे घराबाहेर पडले होते, तर चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात, त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता रेल्वे स्टेशनवर आलेल्यांची संख्याही यामध्ये जास्त आहे. प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधीकधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले. अशावेळी संबंधित मुलं किंवा मुलींची चौकशी करून ही कारवाई करण्यात आली आहे.
मागील 7 महिन्यात सापडलेल्या मुलांची आकडेवारी
मुंबई – 166 (104 मुले आणि 62 मुली)
भुसावळ 70 (39 मुले आणि 31 मुली)
नागपूर 40 (22 मुले आणि 18 मुली)
पुणे 171 (130 मुले आणि 41 मुली)
सोलापूर 30 (15 मुले आणि 15 मुली)
मध्य रेल्वेत केवळ जुलै 2021 मध्ये 73 जणांची (ज्यामध्ये 47 मुले आणि 26 मुली) सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या पालकांसोबत पुन्हा एकत्र आणण्यात आले.
यामधील एका तरुणीची चौकशी केली असता, ती बिहारच्या पाटणा येथे राहते आणि मुंबईत मॉडेलिंग/अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता घरातून पळून आली असल्याचेही तीने सांगितले. पुढील कारवाईसाठी चाइल्डलाइन कर्मचारी सुश्री शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी या मुलीला बालसुधार गृह, डोंगरी यांच्याकडे सुपूर्द केले.
दुसऱ्या घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी, तिच्या आईने फटकारल्यानंतर घरातून पळून निजामुद्दीन- पुणे यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीने आली प्रवास केला होता. चौकशी केल्यावर मुलगी फक्त तेलगू बोलू शकते. तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला. त्यानंतर, आरपीएफ कॉन्स्टेबल जाधव आणि लेडी कॉन्स्टेबल सुश्री पी श्रीवास यांनी पुढील कारवाईसाठी मुलीला साथी एनजीओकडे सोपवले.
477 kids rescued, reunited with families in 7 months with RPF help. pic.twitter.com/nhK9PiZOhx
— Central Railway (@Central_Railway) August 20, 2021