फेमस

Tokyo Olympics 2021 : भारताला मिळवून दिले कास्यपदक परंतु सेमीफायनलमध्ये लावलीनाचा पराभव.

लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती

Tokyo Olympics 2021 : महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला असला तरीदेखील तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे.विश्वविजेता तुर्कीच्या बुसेनाजन सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं.

मेरी कॉमने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये( Landon Olympics)  कांस्यपदक जिंकले. वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणाऱ्या लवलीनाला विजेंद्र आणि मेरी कोमला मागे टाकण्यासाठी पूर्ण संधी होती. 2008 मध्ये विजेंदर सिंगने तर मेरी कोमने 2012 मध्ये कास्य पदक जिंकले होते. त्यानंतर 9 वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे.

आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण (silver medal)किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश आले नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं( busenaj surmenelin) या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारत एका रौप्य आणि दोन कास्य पदकासह 62 व्या स्थानावर आहे. क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला 4-1 अशा मोठ्या फरकानं मागे टाकून तीचा पराभव केला आहे.

23 वर्षीय भारतीय बॉक्सर लवलीनाच्या( lavlina) कारकीर्दीतील तिने आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर 10 सामान्यात तिला पराभव आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments