खूप काही

Tokyo Olympic : नीरज चोप्राचा धुंवाधार थ्रो… भारताची ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरी, पाहा कसं होता भारताचा प्रवास

भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

Tokyo Olympic : टोकियो ऑलिंपिक्स 2020 (Tokyo Olympics 2020)  मधील शनिवारचा दिवस (७ जुलै) भारतासाठी आनंद घेऊन आला आहे. भालाफेक या खेळात भारताच्या नीरज चोप्राने ( Niraj chopra )  अव्वल क्रमांक पटकावत ऑलिंपिकचे सुवर्ण पदक जिंकला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्याच्याकडून पदकाची आशा केली जात होती आणि तो भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला. आता त्याच्या या विजयाने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक ( gold medal ) मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला आज सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. याचबरोबर, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत 6 पदकं जिंकली होती. त्यानंतर आता 2021 मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिंकत, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

पात्रता फेरीत 86.65  मिस्टर भालाफेक करून नीरजने अंतिम फेरीसाठी पात्र मिळवले होते. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये 87.03 मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत 87.57 मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो 76.79 मीटरची फेक करू शकला.

अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये 84.02 मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी 87.57 मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक 86.03 मीटर, दुसरी फेक 87.58 मीटर, तिसरी फेक 76.79 मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं 86.67 मीटर, तर वेसेली 85.44 मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळालं.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे.टोक्यो ऑलिम्पिकच्या 18 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी 126 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.

भारत 1900 पासून ऑलिम्पिक स्पर्धेत ( Olympics ) भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम 1896 मध्ये ग्रीसच्या अ‍ॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने 1900 साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 9 सुवर्ण, 8 रजत आणि 15 कांस्य पदकं पटकावली आहेत.

हे ही वाचा : 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments