स्पोर्ट

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी, अवनीने मिळवले सुवर्ण…

भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.

Tokyo Paralympics : जपानच्या टोकियोमध्ये सध्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्या स्पर्धेमध्ये भारतातील सर्व खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत.भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. Great performance of Indian athletes in Paralympics, Avni won gold …

19 वर्षीय अवनी लेखरा ही पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. अवनीने संयम राखत 249.6 पॉईंटसह विश्व विक्रमाची बरोबरी केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

यानंतर लगेचच थाळीफेकमध्ये योगेश कथुनिया याने रौप्यपदक मिळवले असून, भालाफेक पटू देवेंद्र झाजरिया यानेही रौप्यपदकाची कमाई केली.तर सुंदर सिंगकडून शॉटपुट मध्ये कांस्य पदक पटकावण्यात आले.

भारताला पॅरालिम्पिकमध्ये मिळालेली पदके….
रविवारी भाविनाबेन पटेलने महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत क्लास 4 मध्ये आणि निषाद कुमारने पुरुषांच्या टी 47 उंच उडी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तसेच थाळीफेकमध्ये विनोद कुमारने रविवारी कांस्य पदक पटकावले होते. मात्र, त्याच्या अपंगत्वाच्या प्रकारावर आक्षेप घेतल्याने त्याला याचा आनंद साजरा करता आला नव्हता. यामुळे पदक समारंभ 30 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments