खूप काही

Top Listed Car : देशातील सर्वात जास्त विक्री होणारी गाडी ; विविध वैशिष्ट्ये उपलब्ध

पहिला नंबर पटकवण्यात यश मिळवलं आहे.

Top Listed Car : मारुती सुझुकी वॅगनर कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.मारुती सुझुकी वॅगनर या कारने जून 2021 मध्ये 19,447 युनिट्सची विक्री टप्पा पूर्ण केला आहे.

गेल्या महिन्यात मारुती वॅगनरच्या (Maruti WagonR ) एकूण 22,836 वाहनांची विक्री झाली असून. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत हैचबाग वॅगनरने पहिला नंबर पटकवण्यात यश मिळवलं आहे.

जून 2021 मध्ये याकंपनीने या कारच्या 9,941 युनिट्सची विक्री केली आहे, परंतु यावर्षी हीच आकडेवारी 3389 युनिटने (unit) इतकी वाढली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत यावेळी 70% नफा झाला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 13513 वॅगनरची विक्री झाली होती.

देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने वॅगनरच्या CNG व्हेरिएंटची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. वॅगनआरने उत्तम CNG पर्याय ग्राहकांनसाठी उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांनी देखील यासाठी पसंती दाखवली आहे.

दिल्लीत ( Delhi )  वॅगनआर एक्स-शोरूम किंमत 4,80,500 ते 6,33,000 रुपये आहे. 5-सीटर कारच्या फीचर लिस्टमध्ये 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील समाविष्ट आहे. ज्यात अँड्रॉइड ऑटो  आणि  अॅपल,   कारप्ले, मॅन्युअल एसी, चारही पॉवर विंडो, कीलेस एंट्री आणि स्टीयरिंग आरोहित ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल आहेत. कारमध्ये ड्राईव्ह साइड एअरबॅग, EBD सह ABS आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मागील पार्किंग सेन्सर( parking sensors)  सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात.;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments