कारण

Top News: अफगाणिस्तानाच्या सुटकेतून मोदी सरकारने भारतीयांना केले आझाद

सहजतेने तालिबानला संपूर्ण अफगाणिस्तान मिळालाय.

Top News: अमेरिकेसह संपूर्ण जगाचा डोळा चुकवत तालिबानने ( Taliban ) अवघ्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं. तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानातील काबुल ताब्यात घेतल्यावर तिथली परिस्थिती भयानक झाली आहे .तालिबानने अफगाणिस्तानात केवळ राजकीय सत्ता काबीज केली नाही, तर त्यांनी अमेरिकेकडून शस्त्रे, दारूगोळा, हेलिकॉप्टर इत्यादी ताब्यात घेतले आहे. अत्यंत सहजतेने तालिबानला संपूर्ण अफगाणिस्तान मिळालाय. (Afganistan kabul )

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचं आव्हान मोदी सरकारचा समोर आहे. काबूल विमानतळावरील दृश्य, व्हिडीओ पाहिल्यानंतर काळाजाचा ठोका चुकेल. अफगाणि नागरिक आपल्या कुटुंब कबिल्यासह देश सोडण्यासाठी हतबल झाले आहेत. ( Kabul video , photos)

भारतातल्या अडकलेल्या नागरिकांची सुटका आता पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या हाती आहे. ( Narendra Modi ) एअर इंडियाच्या दोन विमानांना स्टँडबाय मोडवर ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारनं दिल्या .आता भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलानं सूत्रं हाती घेतली आहेत .

भारतीय हवाई दल पुन्हा एकदा परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी देवदूत ठरणार आहेत. हवाई दलाच्या दोन सी-17 ग्लोबमास्टर विमानांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट केले आहे. काबुलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे तेथील हवाई वाहतूक बंद केली आहे.( C 17 airplane)

भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबाननं दिली आहे.

अफगाणिस्तानातील भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात असून एक किंवा दोन दिवसात त्यांना मायदेशात सुखरुप आणण्यात येईल, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरवले आहे.( Gujrat jamnagar)

भारतीय नागरिकांसोबतच सरकार अफगाण शिख आणि हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींच्यादेखील संपर्कात आहे. त्यांना अफगाणिस्तान सोडून भारतात यायचं असल्यास त्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments