आपलं शहर

Train Updates :कोकणवासीयांना मिळाला दिलासा रेल्वे प्रशासनाने अधिक गाड्यांचे केले नियोजन

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी आहे

Train Updates :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी कोकणवासियांना गावी जाताना अडचण होणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनाने गाड्यांचे नियोजन केले आहे.

गणपती उत्सवासाठी ( ganeshutsav )कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वे प्रशासनानं गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाश्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा पश्चिम रेल्वेनं रेल्वेचा फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सर्वप्रथम कोकणात गणपती स्पेशल ट्रेनच्या 72 फेऱ्या होणार होत्या. त्यात आणखी 40 फेऱ्यांची वाढवण्यात आल्या आहेत. परिस्थिती पाहता पुन्हा आणखी 38 फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं यंदा गणेशोत्सव काळात कोकणात रेल्वेच्या तब्बल 150 फेऱ्या होणार आहेत. 3 ते 18 सप्टेंबर दरम्यान या गाड्या धावणार आहे.

दुपारी धावणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक स्लीपर डबे (slipar )  आणि रात्री धावणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक सिटिंग डबे जोडले आहेत. तर कोकणात कुडाळ, सावंतवाडी येथे गाड्या पोहचण्याची वेळ मध्यरात्री 1 किंवा 2 वाजता ठेवली आहे. त्यामुळे कोकणात एवढ्या मध्यरात्री पुढे गावात जाण्यास प्रवाशांना अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रवासासाठी 17,18, 19 सप्टेंबर या महत्वाच्या दिवशी या गाड्या या सोडलेल्या नाहीत.

मुंबईतून ( mumbai )  दुपारी सुटणाऱ्या गाड्या रत्नागिरी/चिपळूणपर्यंतच (ratnagiri \ chiplun ) ठेवून रात्रीच्या गाड्या सावंतवाडीपर्यंत नेऊ शकले असते. जेणेकरून सर्व गाड्या त्यांच्या शेवटच्या स्थानकात दिवस मावळायच्या आत पोहोचू शकतील. महाड व लांजा तालुक्यात अत्यंत कमी गाड्यां थांबणार आहेत. गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणला एकही गाडीचा थांबा नाही.

प्रत्येकाने करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाच्या दरम्यान करोना प्रतिबंधक ( covid restrictions ) नियम पाळलेच पाहीजे. 72 गाड्या सोडून देखील जर प्रवासी वेटींग असेल, तर भारत सरकार रेल्वे मंत्रालय अजूनही गाड्या सोडेल असे सांगितले जाते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments