खूप काही

Uday samant : महाविद्यालये लवकरच सुरू होणार, नियमावली जाणून घ्या

ज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि विद्यापीठे शारीरिकरित्या पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे

Uday samant : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि विद्यापीठे शारीरिकरित्या पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहेत, असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पुण्यात सांगितले.“तथापि, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची,शक्यता लक्षात घेऊन राज्य कार्यदलाने आम्हाला थांबायला सांगितले आहे. म्हणूनच हा निर्णय लागू करण्यास थोडा विलंब होत आहे, ”सामंत म्हणाले,

Schools will start soon, learn the rules

तसेच विद्यापीठासह महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत ऑफलाईन महाविद्यालये सुरू होतील; परंतु लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडील उपलब्ध लशींमधून 30 टक्के लसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी नांदेड येथे सांगितले.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठास भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या वेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.सामंत म्हणाले,की राज्यात एकूण 42 लाख विद्यार्थी उच्च व तंत्रशिक्षण घेत आहेत. करोनामुळे ऑनलाईन सुरू असलेले वर्ग आता ऑफलाईन सुरू होऊ शकतील. त्यामुळे यासाठी तयारी सुरू आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध लशींमधून 30 टक्के लशी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमधून हा प्रयोग सुरू करण्यात येईल. – उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments