खूप काही

Udhav thackeray : देशाला कंडक्टर सारखा पंतप्रधान हवा उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधानांवर निशाणा….

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Udhav thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण पार पडलं. यावेळी बेस्टच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही.जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले

बेस्ट बससेवेचा आज वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनानिमित्त आज बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ठाकरेंनी इलेक्ट्रिक बसेसच्या उपक्रमाचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित होते.

बेस्टच्या सर्व वाहन-चालक आणि कर्मचाऱ्यांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. तसेच देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मुंबईकराचा बेस्ट आणि लोकल रेल्वेशी संबंध येतो. बेस्ट ऊन वारा पावसात सुरू असते. कोरोनाकाळात बेस्टने उत्तम काम केलं. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद. आदित्यने सांगितलं की आपल्या वचननाम्यात आम्ही म्हटलं होतं एकच तिकीट सगळ्यांसाठी पाहिजे. बेस्टची एक तिकीट सिस्टिम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोमध्ये एकच तिकीट चालू शकेल. लोकलबाबत विचारणा होत आहे , चावी आपल्याकडे आहे, ती किती फिरवायची हे आपल्या हातात आहे, लोकल सुरू करायचा आहेत, हॉटेल सुरू करायच्या आहेत. यांची चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची असं मुख्यमंत्री म्हणाले.

उपस्थितांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.तसेच पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. अलिकडच्या काळात निसर्गचक्र बदलते आहे. पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बससेवा हे एक क्रांतिकारी पाऊल आहे.

तसेच कोरोनाकाळात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची कोणतीही अडचण येऊ दिली नाही. कोरोनाकाळात अनेक बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु तरी देखील बेस्ट थांबली नाही, असे देखील कौतुकोद्वार ठाकरेंनी यावेळी काढले.

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

 

हे ही वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments