खूप काही

Udhav thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्यातपुन्हा लॉकडाऊनचा इशारा…

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं.

Udhav thackeray : देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन करोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं.(Chief Minister Uddhav Thackeray warns of lockdown in the state again …)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा इतिहास फक्त लक्षात ठेवून आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, पण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची जपणूक करणं आपली जबाबदारी आहे. गेल्या एक वर्षांपासून आपण कोरोना व्हायरसचा सामना करत आहोत.हे वेगळ पारतंत्र्य फक्त आपणचं नाही तर संपूर्ण जग अनुभवत आहे.’

तसेच, स्वातंत्र्यदिनानंतर १६ ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी करोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयी भूमिका स्पष्ट केली.

गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. करोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘पण त्याचं बरोबर आपण इशाराही दिला आहे. कोरोनाचा कहर आपण दोन्ही वर्षी अनुभवला आहे. शिथिलता दिली असली तरी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू शकेल. लॉकडाऊन नको असल्यास सर्वांनी खबरदारी घेतली तर आपण त्यातून नक्कीचं बाहेर पडू.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्यातूनही मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्या 16 ऑगस्ट आहे. आपण अनेक बंधनांमध्ये शिथिलता आणली आहे. पण कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. परदेशात काही ठिकणी पुन्हा कोरोना संकट उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये म्हणून आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. आपण निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.

म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो”, असं ते म्हणाले.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments