खूप काही

Udhav thackeray : ठाकरेंकडून गडकरींचे कौतुक; ‘दोघे मिळून महाराष्ट्राचा विकास करू’

मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं तुम्ही जोडली. आता तर अंतर कमी करुन तुम्ही ती अजून जवळ आणत आहात, असे ते म्हणाले.

Udhav thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सहकार्यासाठी मदतीची साद घातली आहे. तसेच या वर्षीचा पावसाळा अजुन संपला नाही, अजून दोन तीन महिने आहेत. आपले रस्ते पूर्णपणे खचले, पूल वाहून गेले आहेत. मला तुमच्या सर्व तंत्रज्ञानाची मदत हवी आहे. महाराष्ट्राला गरज आहे. जेणेकरून आता जे काही काम करू, ते पर्यावरणाला सांभाळून करू. जे काम केलं त्यात मजबुतीकरण कसं करू याची मदत तुमच्याकडून लागेल,’ अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी केली आहे.

मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं तुम्ही जोडली. आता तर अंतर कमी करुन तुम्ही ती अजून जवळ आणत आहात, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला बोलावंलं. मला पुणे-मुंबईचा रस्ता सरळ पाहिजे, अशी इच्छा तुमच्याकडे व्यक्त केली. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं.

‘गडकरीजी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणत आहात. कितीही पाऊस पडला, तरी पुढची काही वर्षे रस्त्यावर खड्डा पडणार नाही, असं तुम्ही म्हणाला होतात. आता खड्ड्यांच्या पलिकडे जाऊन रस्तेच्या रस्ते खचत आहेत. तिथे तुमची मदत हवी. या वर्षीचं संकट निभावून नेऊ; पण पुढच्या वर्षी संकट आलं तर? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना केला आहे.

दोन शहरांना आणखी जवळ आणले, या दोन्ही शहरांत ये-जा करण्यासाठी पाच तास लागायचे. रस्ते कोंडी व्हायची. हा प्रवास दोन तासावर आला पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख तुम्हाला म्हणाले होते,’ अशी आठवण ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.

नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी गडकरी यांच्या कामाचे कौतुक केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments