खूप काही

Updated News : कोरोनामुळे दहशतवाद्यांची संख्या घटली, काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांची माहिती…

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.

Updated News : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir pulwama ) जिल्ह्यात सुरक्षा दलांशी शनिवारी झालेल्या चकमकीत ‘जैश ए महंमद’चे दोन दहशतवादी ठार झाले. पुलवामा 2019( pulwama 2019) मध्ये झालेल्या भारतीय पोलीस दल जवानांच्या गाड्यांवर बॉम्बहल्ला करण्याच्या प्रकरणात हे दोन्ही दहशतवादी सामिल होते.

दाचीग्राम येथील नंबियान आणि मरसर या जंगली भागांत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे दिवसभर शोधमोहीम राबवली असून या वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार( attack) केला.या चकमकीत सुरक्ष दलाने प्रत्युत्तर देताना झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी पाकिस्तानी असून अद्यापही त्याची ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन सोडून स्फोट घडवण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. हा घातक स्फोट आत्मघाती बॉम्ब हल्लेखोर अदिल दर याने घडवून आणला होता. पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांच्या माहितीनुसार आज ठार झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव महंमद इस्माल अल्वी ऊर्फ लंबू ऊर्फ अदनान असे आहे. तो ‘जैश ए महंमद’चा प्रमुख मासूद अझर याचा नातेवाईक आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात सामील होते. राष्ट्रीय तपास संस्थेच्या आरोपपत्रातही त्याचे नाव होते.

जम्मू : दोन दहशतवादी कृत्यांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे घातले.

त्यात ‘लष्करए मुस्तफा’च्या (Lashkar Mustafa) दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्यांन जवळ असलेल्या डिजिटल साधने, गोळ्यांच्या पुंगळ्या, प्लास्टिकची मुखावरणे आणि जिहादबाबतची हस्तलिखिते जप्त केलेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

’जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षभरात 89 दहशतवादी झाले असून त्यामध्ये सात दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.कोरोनामुळे देशातील परिस्थिती पाहता गेल्या वर्षीपेक्षा यंदा ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या कमी आहे.(The number of terrorists killed this year is lower than last year)

या वर्षी दहशतवाद्यांचे अनेक म्होरके मारले गेल्याचे काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments