विद्यापीठ

Varsha gaikwad : शाळा कधी सुरु होणार; शिक्षण मंत्र्यांनी सांगितली स्पष्ट भूमिका

12 ऑगस्टला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "शाळा सुरू करण्यासाठी एसओपी आहेत त्याची माहिती आम्ही टास्क फोर्सला देणार आहोत.

Varsha gaikwad : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असला तरी शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आहे की नाही? असा प्रश्न स्थानिक प्रशासन आणि शिक्षकांसमोर आहे. When will school start; The clear role stated by the Minister of Education

हा गोंधळ होण्याचे कारण म्हणजे 10 ऑगस्ट रोजी जीआर जारी केल्यानंतर कोव्हिड टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ असं सांगितलं.

“शाळा सुरू करण्यासाठी एसओपी आहेत त्याची माहिती आम्ही टास्क फोर्सला देणार आहोत. त्यांच्या एसओपी आमच्याकडे येतील त्याची आम्ही माहिती घेऊ. आम्ही कुठेही सक्ती केलेली नाही. दोन-चार दिवसांत पुन्हा चर्चा करू त्यानंतर निर्णय घेतला जाईल.”परंतु चार दिवस उलटले तरी शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप स्पष्टता दिलेली नाही. शासन निर्णय कायम राहणार की स्थगित केला जाणार याबाबत मुख्याध्यापक आणि शाळा संस्थाचालकांमध्येही संभ्रम आहे.12 ऑगस्टला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या

81 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यासाठी सहमती दर्शवल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. तसंच राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले असून रेल्वे लोकल सुरू झाली आहे. बाजारपेठा, दुकानं सुरू ठेवण्याच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात ते म्हणाले, “रेल्वे, मॉल्स याठिकाणी लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच परवानगी दिली आहे. त्यासाठी नियमावली स्पष्ट आहे. त्याचे पालन संबंधित व्यवस्थेला करता येणार आहे. शाळा सुरू करतानाही अशी तयारी करणं गरजेचं आहे.”

“आम्ही केवळ वैद्यकीयदृष्ट्या सल्ला देऊ शकतो. अनेक गोष्टी प्रत्यक्षात शक्य असतीलच असं नाही. पण किमान शिक्षण क्षेत्रातील लोकांशी याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे. आम्ही थेट त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी तयार आहोत. यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्या,” अशीही मागणी टास्क फोर्सने केली आहे.

 

 

हे ही वाचा : 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments