स्पोर्ट

Mumbai Indians : व्हिडीओ व्हायरल, मुंबई इंडियन्सची अबुधाबीमध्ये कसून प्रॅक्टीस…

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा आता काही दिवसात सुरू होणार आहे. काही आयपीएल संघ यूएईला पोहोचले आहेत आणि काही पोहचणार आहेत.

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा आता काही दिवसात सुरू होणार आहे. काही आयपीएल संघ यूएईला पोहोचले आहेत आणि काही पोहचणार आहेत. युएईमध्ये अलग क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर संघांनी सराव सुरू केला आहे. आता आयपीएलचा पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सही या यादीत सामील झाला आहे. (rohit sharma)

मुंबई इंडियन्सची टीम 13 ऑगस्टला अबू धाबीला पोहोचली, तिथे 6 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर, टीम आता सराव करत आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

मुंबई इंडियन्सने सराव सत्राचा व्हिडीओ ट्विट करून सरावाबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये ईशान किशन, धवल कुलकर्णी, जयंत यादव, आदित्य तारे सारखे खेळाडू सराव करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत झहीर खान आणि रॉबिन सिंगही दिसत आहेत. व्हिडीओमध्ये खेळाडू नेट सराव करताना दिसत आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू अजूनही इंग्लंडमध्ये आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर हे खेळाडू थेट संघात सामील होतील.

याआधी शुक्रवारी मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात खेळाडू मजा करताना आणि पूल व्हॉलीबॉल खेळताना दिसत होते. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स सध्या चौथ्या स्थानावर आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments