आपलं शहर

YONO LITE : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ऑनलाईन बँकिंग सेवेमध्ये सुधारणा…..

YONO LITE : डिजीटल व्यवहारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आजही ऑनलाइन फसवणुकांमध्ये पूर्वीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे.

YONO LITE  : डिजीटल व्यवहारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आजही ऑनलाइन फसवणुकांमध्ये पूर्वीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑनलाईन बँकिंग सेवेमध्ये सुधारणा केली आहे.

जेणेकरून, ऑनलाईन बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. ऑनलाईन फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि तसेच, ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो लाईट (YONO LITE) ॲपमध्ये बदल केला आहे आणि यासाठी सिम बाइंडिंग विचार लॉंच करण्यात आले आहेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी आशुतोष सिंह यांनी दिली आहे.

हे फिचर एकावेळेला फक्त एका डिवाइसवरच लॉगिन करता येईल. सिम बाइंडिंग फिचर हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्म युनो(YONO) आणि युनो लाईट (YONO LITE) साठी लॉंच करण्यात आले आहेत. या नवीन सुविधेद्वारे ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकेचा अनुभव मिळेल आणि ऑनलाइन सुविधा अजून सुरक्षित होईल असे अशितोष कुमार सिंग म्हणाले.

तसेच आता ऑनलाईन बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. यासाठी ग्राहकांना लेटेस्ट युनो लाईट ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि मोबाईल नंबर रजिस्टर करून फक्त एकच डिवाइसवर लॉग इन करता येऊ शकते. यामुळे ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. तसेच ॲप अपडेट करण्याबरोबरच ग्राहकांना वन टाईम रजिस्ट्रेशन प्रोसेस देखील पूर्ण करावी लागेल असे स्टेट बँक ऑफ इंडियाने नमूद केले आहे.

असे करा ॲक्टिवेट एसबीआय योनो लाईट (YONO LITE) ॲप : 

गूगल प्ले स्टोरवरून एसबीआय युनो लाईट ॲप डाउनलोड करा आणि रजिस्टर मोबाईल नंबर निवडा. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर मेसेज येईल, यामध्ये तुम्हाला प्रोसीड वर क्लिक करावे लागेल त्यानंतर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये दिलेला कोड अपलोड करा. त्यानंतर स्क्रीन वर तुमचे नाव आणि पासवर्ड टाका.

नियम आणि अटी स्वीकारल्यानंतर ओके बटन वर क्लिक करा. तुम्हाला एक ॲक्टिवेशन कोड मिळेल हा ॲक्टिवेशन कोड फक्त 30 सेकंदासाठी ॲक्टिव्ह असेल,ॲपमध्ये हा कोड टाकल्यानंतर ॲक्टिवेशन ची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही युनो लाईट (YONO LITE) ॲप वापरू शकाल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments